स्त्री जाणिवा व स्त्री संवेदन : आकलन !!
महात्मा फुले माय सावित्री यांच्या कार्यातून जी क्रांतीची सुरुवात झाली आणि समाजमन ढवळून निघाले.
फुले युग ते आतापर्यंतचा काळ या अंतरात भारतीय समाजाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. देशाचे स्वातंत्र्य. डॉक्टर बाबासाहेबांनी चालविलेली मानवमुक्तिची चळवळ. घटनेतून महामानवाने दिलेले न्याय व समतेचे अधिकार. शिक्षण क्षेत्राच्या रुंदावलेल्या कक्षा. जागतिकीकरण यातून विदेशी संस्कृतीचे झालेली तोंडओळख.
शिक्षणामुळे स्त्रियांचं जागृत झालेलं आत्मभान. याच आत्मभानातून स्त्रिया लिहू लागल्या. आपलं जगणं, भोगणं, दु:ख , घुसमट, संघर्ष, साहित्यातून मांडू लागल्या. 'स्व' च्या जाणिवेतून मनात कोहम् चा उमटलेल स्वर, त्यांच्या साहित्यातून न उमटला तरच नवल !!
आपल्या लोकशाही समाजव्यवस्थेत आजही स्त्रियांना पारंपारिक साच्यात घट्ट बांधलेलं आहे.
नव्हे तर संपूर्ण जगात कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती पहायला मिळते.
कॅट मिलेट या लेखिकेने सेक्शुअल पॉलिटिक्स (१९७७)
या ग्रंथांमध्ये अशी भूमिका मांडली आहे की, पितृसत्ताक व्यवस्था हीच स्त्रियांच्या शोषणाचे अदिकारण आहे.
या साच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा चाललेला अंतर्गत संघर्ष. बाहेरच्या जगाशी संघर्ष. यातून निर्माण होणारा ताण हे सगळं त्यांच्या साहित्यातून मांडला जात आहे.स्त्रिया जबाबदारीने लेखन करीत आहेत. मात्र याची दखल म्हणावी तशी घेतली जात नाही.
करिता स्त्रियांच्या साहित्याचा आढावा घेऊन त्याची समीक्षा होणे अत्यावश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर रचना यांचा हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे.
समीक्षक रचना यांचा स्त्री जाणीवा स्त्री संवेदन हा ग्रंथ यांची पुर्तता करतो करतो.
साहित्याच्या इतिहासात स्त्री साहित्याचं स्थान गौण आहे. या करिता स्त्रिसमिक्षकांनी पुढे येवून स्त्री साहित्याची नोंद घेणे ही काळाची गरज आहे. नाही तर स्त्रिसाहित्य कायम दुर्लक्षित राहण्यचीच जास्त शक्यता आहे.
साहित्यातील गुणदोषांचा अभ्यास करणे, अवलोकन करणे, व त्या सहित्याचे रसग्रहण करित त्याचे निष्कर्ष काढणे म्हणजेच समिक्षा असे म्हणता येईल.
समिक्षेकडून साहित्याची नोंद घेणे सोबतच त्या साहित्य कृतीतील विचाराचा गाभा विस्ताराने मांडणे अपेक्षित आहे.
या सर्वच पातळ्यांवर लेखिका यशस्वी झाली आहे.
एक आगळा वेगळा उपक्रम राबवत, रचना यांनी
वेगवेगळ्या वयोगटातील , महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या, वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणाऱ्या, शैक्षणिकदृष्ट्या असलेले वेगळेपण, गृहिणी, विद्यार्थ्यांनी, डॉक्टर , इंजिनिअर, शिक्षिका, प्राध्यापक, अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या कवयित्रींच्या कवितेचा अभ्यास या ग्रंथातून केलेला आहे.
तीन पिढ्यातील कवियत्री च्या कवितेचा एकत्रितपणे अभ्यास करणारा रचना यांनी स्त्री जाणिवा या समीक्षा ग्रंथाने समीक्षेच्या क्षेत्रात दमदार पाऊल ठेवले आहे. समीक्षा हा तसा क्लिष्ट वाटणारा विषय रचना यांनी अतिशय सहज सुंदरपणे हाताळला आहे.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात राहणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील भिन्न प्रवर्गातील कवयित्रींच्या कवितेचा जाणीवपूर्वक केलेला हा अभ्यास समीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर टाकणारा आहे.
या ग्रंथासाठी राज्यभरातील 2000 नंतर लिहिणार्या 15 कवियत्रींची निवड केलेली आहे.
पहिल्या प्रकरणात लेखिकेने ग्रंथाची पार्श्वभूमी व प्रयोजन यामागची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
.इसवी सन 2000 पूर्वीच्या मराठी कवियित्री यांच्यावर स्त्री जाणिवा व स्त्री संवेदनांची मांडणी करण्याचा प्रयत्न झाला आहे.
मात्र 2000 नंतरच्या कवयित्रींच्या कवितेतील अशा जाणिवा संवेदना यांची मांडणी करणे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मार्ग भागातील कवयित्रींच्या कवितेचा अभ्यास करणे. स्त्रिजाणिवा आणि संवेदन यांचे समकालीन स्वरूपाचा व इतर काही बाबींचा अभ्यास करणे.
असे या ग्रंथाचे प्रयोजन असल्याचे लेखिका नमूद करते. यासोबतच पहिल्या प्रकरणात स्त्रीवादी चळवळीचा इतिहास ही थोडक्यात मांडलेला आहे.
डॉक्टर भाग्यश्री यशवंत यांची कविता स्त्रियांच्या जगण्या- मरण्यातील चिरंतन दुःखाच्या भळभळणाऱ्या जखमा व्यक्त करत असतानाच मानवी मूल्यांचा वेध घेते. अशी मांडणी करत भाग्यश्री यशवंत यांच्या कवितेची चिकित्सा अतिशय संयतपणे केलेली आहे.
रचना यांनी या ग्रंथातून सर्वच कवयित्रींच्या कवितेला योग्य न्याय देत त्यातील सामर्थ्य व मर्यादा याची नोंद घेतली आहे.
मात्र हे करीत असताना सृजनांकूंर कुठेही करपून जाणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजीपूर्वक दक्षता घेतली आहे.
वैशाली मोहिते यांची कविता स्त्री जाणिवेने ओतप्रोत भरलेली आहे. तसेच स्वतःची व पर्यायाने स्वतःच्या अस्तित्वाशी संवाद साधताना वास्तवतेचे भान ठेवून आत्मपरीक्षण हे वैशाली यांच्या कवितेचे वैशिष्ट्य असल्याचे रचना यांनी नोंद केलेली आहे.
ग्रंथातील कायद्याची विद्यार्थिनी असलेली श्रावणी बोलगेच्या कवितेविषयी लेखिका म्हणते,
चाळिशीच्या आसपास येणारा प्रगल्भपणा श्रावणीच्या ऐन विशीत आलेला दिसतो, हे अकाली प्रौढत्व नसून स्त्रियांच्या जगण्याचा व्यथांचा संघर्षाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो.
कवितेतील येणाऱ्या विचाराचे बारकावे लेखिका अशा प्रकारे टिपते.
स्वाती पाटील यांची कविता स्व- जाणीवेकडून सामाजिकतेचा आयाम कवेत घेणारी, स्त्रियांच्या जगण्यात येणारा संघर्ष, मानसिक पडझड, तिला वाटणाऱ्या प्रेरणा, हुरप, टिपते व सकारात्मक शेवट हा त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
अशी नोंद त्या स्वाती पाटील यांच्या कवितेची घेतली आहे.
साहित्यातील अनेक संदर्भ देत रचना यांनी कवितेचा पूर्ण सार कोळून काढून अस्सल सत्व वाचका समोर ठेवले आहे.
सर्वहारा वर्गाचे प्रतिनिधित्व करत शोषणाविरुद्धचा मोठा हुंकार दलित साहित्याच्या प्रवाहाने दिला या प्रवाहतील स्त्रियांनी लिहिलेल्या अस्सल कवितेचा आश्वासक सूर डॉक्टर वानखेडे यांच्या कवितेत आढळून येतो.
अशी विशेषता डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या कवितेची नोंदवली आहे.
संगीता गुरव यांची कविता घर, स्त्री-पुरुष आदिबंध, समाविष्ट करते. कवयित्रीची कवितेची भाषा ही रोजच्या जगण्यातील आहे, त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना ही कविता आपली वाटते.
असा विशेष गुणवंत लेखिका संगीता गुरव यांच्या कवितेचे विश्लेषण करीत जातात.
या ग्रंथातील कविता या कवियित्रिंच्या असल्याने भारतीय समाजातील स्त्रियांचं जगणं ,भोगणं, घुसमट, विद्रोह हे विषय अपरिहार्यपणे येतात.
काही जणांचा असा आरोप असतो की स्त्रियांच्या कविता इतर लिखाण या विषयाच्या पुढे जात नाही. तेव्हा असं सांगावंसं वाटतं की मानव समूहाचा अर्धा हिस्सा
अजूनही उपेक्षित घुसमटलेला जीवन जगतो. त्या समूहातील काही लिहित्या हातानी ं त्यांचं जगणं, घालमेल साहित्यातून मांडणं, त्याला प्राथमिकता देणं. सहाजिक आहे व ती जबाबदारी आहे.
या जबाबदारीतूनच स्त्रीलेखिका भारतीय समाजातील एकूणच स्त्री जीवनाचा विस्तृत विश्लेषण करतात
ही बाब कौतुकास्पद आहे .स्त्रियांची भावालंदोने टिपणारा स्त्रियांचं जगणं कवेत घेणारा, असाच हा एक विशेष ग्रंथ आहे.
हे या ग्रंथाचे विशेष आहे.
भावनांची आंदोलने, विरहाचे तरंग, आणि बाईपणाचे निसंदिग्ध उच्चार, हे अर्चना डावखर यांच्या कवितेची बलस्थान आहेत.
असे लेखिका म्हणते.
या प्रकल्पातील कोणत्याही कवितेच्या कवितेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. आहे सावित्री जगदाळे यांच्या कवितेविषयी संत जनाबाई ची
आर्तता व मुक्ताबाईच्या समंजसपणाला वाट पुसत यांची कविता बहरत जाते.
संसारात जिथे प्रत्येक नात्याकडून उपेक्षा पदरात येते. तेव्हा विठ्ठलाची श्रद्धा घट्ट होते .
असा निष्कर्ष नोंदवला आहे.
मानवी जगण्यातील सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक, अनेक कंगोरे घेऊन मनीषा पाटील यांची कविता अवतरते.
हृदय पिळवटून टाकतील अशा विविध छटा त्यांच्या कवितेतून येतात.
अशी मनीषा पाटील यांच्या कवितेची वैशिष्ट्ये नोंदवली आहेत.
घर स्त्री-पुरुष संबंध या साऱ्यांचा तटस्थपणे विचार करत, आत्मभानाचा शोध घेत, स्त्रियांच्या स्वतःच्या आत्मनिष्ठा व्यक्त करणाऱ्या कविता.
असं भाष्य सुनिता शिवनाथ यांच्या कवितेवर लेखिका करते.
उषा हिंगोणेकर यांची कविता ही निर्भय, चिकित्सक, आत्मदक्ष व अंतर्मुख करणारी, शब्दांच्या जंजाळात न अडकता व्यवस्थेच्या विरोधात भाष्य करणारी आहे. असं उषा हिंगोणेकर यांच्या कवितेचे संदर्भात चपखल शब्दात या त्या आपलं मत मांडतात.
मनीषा घेवडे यांची कविता प्रेम याविषयासोबतच बाईपणाच्या स्त्रीत्वाच्या मनाला उध्वस्त करत जगणं नकोसं करणाऱ्या काही शास्वत प्रश्नांना घेऊन समोर येते. असं मनिषा घेवडेंच्या कवितेच्या संदर्भात लेखिका व्यक्त करते.
छाया बेले यांच्या कवितेतून व्यक्त होणारी झेप ही मोठी आहे. मानवी जगण्यातील स्त्री जाणिवा स्त्री संवेदनांचा शोध घेत शोध घेतातच पण त्यांची कविता फक्त स्त्रिया पुरती मर्यादित न राहता ती सामाजिक प्रश्न समस्या वास्तव यांनाही स्पर्श करते. कमीत कमी शब्दात आशयघन कविता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. छाया बेले त्याचवेळी त्यांच्या कवितेतून त्या समाजाचा वेध घेतात. असं मौलिक मत छाया बेले यांच्या कवितेविषयी लेखिका नोंदवते.
समकालीन कवितेचा विचार केला तर हा ग्रंथ मैलाचा दगड ठरावा असा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे या ग्रंथातील सहभागी 15 कवयित्रीच्या कवितेची चिकित्सा करून रचना यांनी आपलं मत अतिशय संयतपणे नोंदवलेलं आहे.
काही ठिकाणी काही उणिवा जाणवत राहतात.
समिक्षेचा निर्मळ व उदात्त हेतूने केलेल्या समिक्षेत
कधी कधी समिक्षकाकडून योग्य अन्वयार्थ लावण्यात उणीव भासली तरी साहित्यिकांनी त्यांना समजून घ्यायला हवे .
या ग्रंथातील एक उदाहरण द्यायचं झालं तर
' अमृता प्रीतम ' या छाया बेले यांच्या कवितेचं देता येईल. अमृता प्रीतम ही ज्ञानपीठ विजेती पंजाबी लेखिका. जिने स्त्रियांवर लादलेले सामाजिक संकेत मोडित काढून , स्वत:च
स्त्री जाणिवा व स्त्री संवेदन : एक अभ्यास - एक आकलन
महात्मा फुले आणि माय सावित्री यांच्या कार्यातून जी क्रांतीची सुरुवात झाली आणि समाजमन ढवळून निघाले. फुले युग ते आतापर्यंतच्या काळात भारतीय समाजाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. देशाचे स्वातंत्र्य, डॉ. बाबासाहेबांनी चालवलेली मानवमुक्तीची चळवळ, घटनेतून महामानवाने दिलेले न्याय व समतेचे अधिकार, शिक्षण क्षेत्राच्या रुंदावलेल्या कक्षा, जागतिकीकरणातून विदेशी संस्कृतीशी झालेली तोंडओळख, शिक्षणामुळे स्त्रियांचे जागृत झालेले आत्मभान.
याच आत्मभानातून स्त्रिया लिहू लागल्या. आपलं जगणं, भोगणं, दुःख, घुसमट, संघर्ष साहित्यातून मांडू लागल्या. 'स्व' च्या जाणिवेतून मनात 'कोहम्' चा उमटलेला स्वर त्यांच्या साहित्यातून न उमटला तरच नवल.
आपल्या लोकशाही समाजव्यवस्थेत आजही स्त्रियांना पारंपारिक साच्यात घट्ट बांधलेले आहे. किंबहुना संपूर्ण जगात कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती पाहायला मिळते. कॅट मिलेट या लेखिकेने 'सेक्शुअल पॉलिटिक्स' (१९७७) या ग्रंथात अशी भूमिका मांडली आहे की, पितृसत्ताक व्यवस्था हीच स्त्रियांच्या शोषणाचे मूळ कारण आहे.
या साच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा चाललेला अंतर्गत संघर्ष, बाहेरच्या जगाशी संघर्ष, यातून निर्माण होणारा ताण हे सगळं त्यांच्या साहित्यातून मांडले जात आहे. स्त्रिया जबाबदारीने लेखन करीत आहेत, मात्र याची दखल म्हणावी तशी घेतली जात नाही. करिता स्त्रियांच्या साहित्याचा आढावा घेऊन त्याची समीक्षा होणे अत्यावश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर समीक्षक रचना यांचा 'स्त्री जाणिवा - स्त्री संवेदन' हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. साहित्याच्या इतिहासात स्त्री साहित्याचे स्थान गौण आहे. या करिता स्त्री-समीक्षकांनी पुढे येऊन स्त्री साहित्याची नोंद घेणे ही काळाची गरज आहे. नाही तर स्त्री-साहित्य कायम दुर्लक्षित राहण्याचीच जास्त शक्यता आहे.
साहित्यातील गुणदोषांचा अभ्यास करणे, अवलोकन करणे, व त्या साहित्यकृतीतील विचाराचा गाभा विस्ताराने मांडणे म्हणजेच समीक्षा असे म्हणता येईल. समीक्षेकडून साहित्याची नोंद घेणे सोबतच त्या साहित्यकृतीतील विचाराचा गाभा विस्ताराने मांडणे अपेक्षित आहे. या सर्वच पातळ्यांवर लेखिका यशस्वी झाली आहे.
एक आगळा वेगळा उपक्रम राबवत रचना यांनी वेगवेगळ्या वयोगटातील, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या, वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणाऱ्या, शैक्षणिकदृष्ट्या वेगळेपण असलेल्या, गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, प्राध्यापक अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या कवयित्रींच्या कवितेचा अभ्यास या ग्रंथातून केलेला आहे.
तीन पिढ्यातील कवयित्रींच्या कवितेचा एकत्रितपणे अभ्यास करणारा 'स्त्री जाणिवा' या समीक्षा ग्रंथाने समीक्षेच्या क्षेत्रात रचना यांनी दमदार पाऊल ठेवले आहे. समीक्षा हा तसा क्लिष्ट वाटणारा विषय रचना यांनी अतिशय सहज सुंदरपणे हाताळला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात राहणाऱ्या, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील, भिन्न प्रवर्गातील कवयित्रींच्या कवितेचा जाणीवपूर्वक केलेला हा अभ्यास समीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर टाकणारा आहे.
या ग्रंथासाठी राज्यभरातील २००० नंतर लिहिणाऱ्या १५ कवयित्रींची निवड केलेली आहे. पहिल्या प्रकरणात लेखिकेने ग्रंथाची पार्श्वभूमी व प्रयोजन यामागची भूमिका स्पष्ट केलेली आहे. इ.स. २००० पूर्वीच्या मराठी कवयित्रींवर स्त्री जाणिवा व स्त्री संवेदनांची मांडणी करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र २००० नंतरच्या कवयित्रींच्या कवितेतील अशा जाणिवा-संवेदना यांची मांडणी करणे, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील कवयित्रींच्या कवितेचा अभ्यास करणे, स्त्री-जाणिवा आणि संवेदन यांचे समकालीन स्वरूपाचा व इतर काही बाबींचा अभ्यास करणे, असे या ग्रंथाचे प्रयोजन असल्याचे लेखिका नमूद करते. यासोबतच पहिल्या प्रकरणात स्त्रीवादी चळवळीचा इतिहासही थोडक्यात मांडलेला आहे.
डॉ. भाग्यश्री यशवंत यांची कविता स्त्रियांच्या जगण्या-मरण्यातील चिरंतन दुःखाच्या भळभळणाऱ्या जखमा व्यक्त करत असतानाच मानवी मूल्यांचा वेध घेते, अशी मांडणी करत भाग्यश्री यशवंत यांच्या कवितेची चिकित्सा अतिशय संयतपणे केलेली आहे. रचना यांनी या ग्रंथातून सर्वच कवयित्रींच्या कवितेला योग्य न्याय देत त्यातील सामर्थ्य व मर्यादा याची नोंद घेतली आहे. मात्र हे करीत असताना सृजनांकुर कुठेही करपून जाणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजीपूर्वक दक्षता घेतली आहे.
वैशाली मोहिते यांची कविता स्त्री-जाणिवेने ओतप्रोत भरलेली आहे. तसेच स्वतःशी व पर्यायाने स्वतःच्या अस्तित्वाशी संवाद साधताना वास्तवतेचे भान ठेवून आत्मपरीक्षण हे वैशाली यांच्या कवितेचे वैशिष्ट्य असल्याचे रचना यांनी नोंदवले आहे.
ग्रंथातील कायद्याची विद्यार्थिनी असलेली श्रावणी बोलगे हिच्या कवितेविषयी लेखिका म्हणते, चाळिशीच्या आसपास येणारा प्रगल्भपणा श्रावणीच्या ऐन विशीत आलेला दिसतो, हे अकाली प्रौढत्व नसून स्त्रियांच्या जगण्याच्या व्यथा, संघर्षाचा गांभीर्याने विचार केलेला दिसतो.
स्वाती पाटील यांची कविता स्व-जाणिवेकडून सामाजिकतेचा आयाम कवेत घेणारी, स्त्रियांच्या जगण्यात येणारा संघर्ष, मानसिक पडझड, तिला वाटणाऱ्या प्रेरणा, हुरहूर टिपते व सकारात्मक शेवट हा त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे, अशी नोंद त्यांच्या कवितेची घेतली आहे.
साहित्यातील अनेक संदर्भ देत रचना यांनी कवितेचा पूर्ण सार काढून अस्सल सत्त्व वाचकांसमोर ठेवले आहे. सर्वहारा वर्गाचे प्रतिनिधित्व करत शोषणाविरुद्धचा मोठा हुंकार दलित साहित्याच्या प्रवाहाने दिला, या प्रवाहातील स्त्रियांनी लिहिलेल्या अस्सल कवितेचा आश्वासक सूर डॉ. वानखेडे यांच्या कवितेत आढळून येतो, अशी विशेषता डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या कवितेची नोंदवली आहे.
संगीता गुरव यांची कविता घर, स्त्री-पुरुष आदिबंध समाविष्ट करते. कवयित्रीची भाषा ही रोजच्या जगण्यातील आहे, त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना ही कविता आपली वाटते.
या ग्रंथातील कविता या कवयित्रींच्या असल्याने भारतीय समाजातील स्त्रियांचं जगणं, भोगणं, घुसमट, विद्रोह हे विषय अपरिहार्यपणे येतात. काही जणांचा असा आरोप असतो की स्त्रियांच्या कविता इतर लिखाण या विषयाच्या पुढे जात नाही. तेव्हा असं सांगावंसं वाटतं की मानव समूहाचा अर्धा हिस्सा अजूनही उपेक्षित, घुसमटलेलं जीवन जगतो. त्या समूहातील काही लिहित्या हातांनी त्यांचं जगणं, घालमेल साहित्यातून मांडणं, त्याला प्राथमिकता देणं सहाजिक आहे व ती जबाबदारी आहे.
भावनांची आंदोलने, विरहाचे तरंग आणि बाईपणाचे निःसंदिग्ध उच्चार हे अर्चना डावखर यांच्या कवितेची बलस्थाने आहेत, असे लेखिका म्हणते.
सावित्री जगदाळे यांच्या कवितेविषयी संत जनाबाईची आर्तता व मुक्ताबाईच्या समंजसपणाला वाट पुसत त्यांची कविता बहरत जाते. संसारात जिथे प्रत्येक नात्याकडून उपेक्षा पदरात येते तेव्हा विठ्ठलाची श्रद्धा घट्ट होते, असा निष्कर्ष नोंदवला आहे.
मानवी जगण्यातील सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक अनेक कंगोरे घेऊन मनीषा पाटील यांची कविता अवतरते. हृदय पिळवटून टाकतील अशा विविध छटा त्यांच्या कवितेतून येतात.
घर, स्त्री-पुरुष संबंध या साऱ्यांचा तटस्थपणे विचार करत आत्मभानाचा शोध घेत स्त्रियांच्या स्वतःच्या आत्मनिष्ठा व्यक्त करणाऱ्या कविता, असं भाष्य सुनिता शिवनाथ यांच्या कवितेवर लेखिका करते.
उषा हिंगोणेकर यांची कविता ही निर्भय, चिकित्सक, आत्मदक्ष व अंतर्मुख करणारी, शब्दांच्या जंजाळात न अडकता व्यवस्थेच्या विरोधात भाष्य करणारी आहे.
मनीषा घेवडे यांची कविता प्रेम या विषयासोबतच बाईपणाच्या स्त्रीत्वाच्या मनाला उद्ध्वस्त करत जगणं नकोसं करणाऱ्या काही शाश्वत प्रश्नांना घेऊन समोर येते.
छाया बेले यांच्या कवितेतून व्यक्त होणारी झेप ही मोठी आहे. मानवी जगण्यातील स्त्री जाणिवा, स्त्री संवेदनांचा शोध घेत असतानाच त्यांची कविता फक्त स्त्रिया पुरती मर्यादित न राहता ती सामाजिक प्रश्न, समस्या, वास्तव यांनाही स्पर्श करते. कमीत कमी शब्दात आशयघन कविता हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे.
समकालीन कवितेचा विचार केला तर हा ग्रंथ मैलाचा दगड ठरावा असा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. या ग्रंथातील सहभागी १५ कवयित्रींच्या कवितेची चिकित्सा करून रचना यांनी आपलं मत अतिशय संयतपणे नोंदवलेलं आहे.
काही ठिकाणी काही उणिवा जाणवत राहतात. समीक्षेचा निर्मळ व उदात्त हेतूने केलेल्या समीक्षेत कधी कधी समीक्षकाकडून योग्य अन्वयार्थ लावण्यात उणीव भासली तरी साहित्यिकांनी त्यांना समजून घ्यायला हवे. या ग्रंथातील एक उदाहरण द्यायचं झालं तर 'अमृता प्रीतम' या छाया बेले यांच्या कवितेचं देता येईल. अमृता प्रीतम ही ज्ञानपीठ विजेती पंजाबी लेखिका, जिने स्त्रियांवर लादलेले सामाजिक संकेत मोडित काढून स्वतःचं माणूसपण स्वीकारून फक्त माणूस म्हणून जगली. मानवतेला कवेत घेऊन लिखाण करत, सत्य तेच मांडून पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या साहित्य क्षेत्रावर अमृता प्रीतमने स्वकर्तृत्वाने अमीट ठसा उमटवला. पुरुषसत्ताक मानसिकतेच्या लोकांनी अनेक ठिकाणी तिची अडवणूक केली. अनेक प्रकारे छळ केला. तरीही तिने या मानसिकतेला भीक घातली नाही. प्रेमाची आदिम भावना कुठलाही आडपडदा न ठेवता मनापासून जगली. हे तिच्या जगण्याचं सत्त्व स्त्रीवादी समीक्षेत अभिप्रेत आहे. तसं न होता पारंपारिक पद्धतीने तिच्या वैयक्तिक जीवनावरच रचना यांनी भाष्य केले आहे. हे खटकत राहते. तिथे तिच्या विचारांवर मत नोंदवणे आवश्यक होते. नाही तर तिला अभिप्रेत असलेल्या स्त्रीवादावर अन्याय होईल. छाया बेले यांच्या कवितेची हीच मागणी आहे.
बाकी अति कौतुक किंवा अति टीका असं न होता त्रयस्थपणे समीक्षा धर्माला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी लेखिकेने घेतली आहे. सर्वच कवयित्रींच्या कवितेतील विशेष गुण दाखवतानाच जाणवलेल्या मर्यादा सुद्धा तेवढ्याच प्रांजळपणे व्यक्त केले आहेत.
ग्रंथाचं मुखपृष्ठ अतिशय सुंदर, उद्बोधक, समर्पक असं आहे. मागील पानावर कवयित्रींच्या नावाची यादी आहे. त्यातील कविता आणि समीक्षा दोन्ही ताकदीच्या, एकमेकास पूरक आहेत. हा प्रकल्प राबविल्याबद्दल रचना यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील लिखाणास खूप खूप शुभेच्छा.
- छाया बेले, नांदेड
अतिशय छान शब्दात समीक्षण केले आहे
उत्तर द्याहटवापुस्तक न वाचताही प्रत्येक वाचकाला या ब्लॉग द्वारे स्रिया वर होणारे अन्याय सहन करत एक स्त्री काय करू शकते हे दाखवून दिले आहे,लेखिका रचना मॅडम यांना सुद्धा अश्याच प्रकारे समाजातून होणारे खच्चीकरण सहन करून पुन्हा उभारी कशी घेतली जाते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्त्री जाणिवा, आणि स्त्री संवेदन
छान लिहिलंय
उत्तर द्याहटवासमीक्षण ..👌👌👌
उत्तर द्याहटवा