पोस्ट्स

समीक्षा ग्रंथ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्त्री जाणिवा व स्त्री संवेदन : आकलन !!

इमेज
महात्मा फुले माय सावित्री यांच्या कार्यातून जी क्रांतीची सुरुवात झाली आणि समाजमन ढवळून निघाले. फुले युग ते आतापर्यंतचा काळ या  अंतरात भारतीय समाजाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. देशाचे स्वातंत्र्य. डॉक्टर बाबासाहेबांनी चालविलेली मानवमुक्तिची चळवळ. घटनेतून महामानवाने दिलेले न्याय व समतेचे अधिकार. शिक्षण क्षेत्राच्या रुंदावलेल्या कक्षा. जागतिकीकरण यातून विदेशी संस्कृतीचे झालेली तोंडओळख. शिक्षणामुळे स्त्रियांचं  जागृत झालेलं आत्मभान. याच आत्मभानातून स्त्रिया लिहू लागल्या. आपलं जगणं, भोगणं, दु:ख , घुसमट, संघर्ष,  साहित्यातून मांडू लागल्या. 'स्व' च्या जाणिवेतून  मनात कोहम् चा उमटलेल स्वर, त्यांच्या साहित्यातून न उमटला तरच नवल !!  आपल्या लोकशाही समाजव्यवस्थेत आजही स्त्रियांना पारंपारिक साच्यात घट्ट बांधलेलं आहे. नव्हे तर संपूर्ण जगात कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती पहायला मिळते. कॅट मिलेट या लेखिकेने सेक्शुअल पॉलिटिक्स (१९७७) या ग्रंथांमध्ये अशी भूमिका मांडली आहे की, पितृसत्ताक व्यवस्था हीच  स्त्रियांच्या शोषणाचे अदिकारण आहे.      या साच्यात...