व्हाया मणिपूर: आपण खरंच माणूस आहोत का? - माणुसकीच्या शोधातला आक्रोश
सुचना: हा लेख केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून लिहिला आहे खरंच आपण माणूस आहोत ? माणूस असलोच तर माणसाची जात ही प्राण्यातील सर्वश्रेष्ठ जात असू शकते ? हेच प्रश्न सतत डोक्यात फिरत आहेत . याला कारण म्हणजे मणिपूरमधील जळत्या जातीय दंगलीत महिलांची झालेली सामूहिक विटंबना. प्राण्यांमध्ये असलं कौर्य पहाण्यात येत नाही . मग उगाच आपण त्या पशूंना नावं ठेवतो . सोशल मीडियावर मणिपूरमधील दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे फोटो ,थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल झाले , ते बघून लकवा मारावा तसं मन , विचार, मेंदू सगळं सुन्न झालं . या घटनेने मानवतेची हत्या केली आहे . पुर्वीपासूनच या देशात स्त्रियांची विटंबना होत आलेली आहे . द्रौपदी , सीता , अहिल्या , वृंदा , तारका , शुर्फणका , स्तनकराच्या विरुद्ध बंड करून स्वतःचे स्तन कापून हौतात्म्य पत्करणारी नांगेली , अगदी अलीकडे स्वतःच्या झालेल्या विटंबनेचा बदला घेत बॅन्डिड क्वीन म्हणून नावारूपाला आलेली फुलनदेवी ...