स्त्री विरुद्ध स्त्री- या संकल्पनेच्या वास्तव कारणांचा विचार !!
स्त्री विरुद्ध स्त्री- या संकल्पनेच्या वास्तव कारणांचा विचार !! “आपण अनेकदा ऐकतो—‘स्त्रीच स्त्रीची शत्रू असते’. पण खरंच हे सत्य आहे का?” मानवी समाजरचनेत स्त्रीचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असले, तरी समाजात तिला दुय्यम दर्जा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर “स्त्री विरुद्ध स्त्री” हा जो दिसणारा संघर्ष आहे, तो केवळ वैयक्तिक मतभेदांचा किंवा स्वभाव वैशिष्ट्ये समजणे योग्य नाही, उलट, हा संघर्ष सामाजिक, सांस्कृतिक आणि संरचनात्मक घटकांनी घडवून आणलेला आहे. स्त्रिया एकमेकींविरुद्ध उभ्या राहतात ही गोष्ट प्रत्यक्षात त्या ज्या व्यवस्थेत जगतात, तिच्या मर्यादांचा आणि दबावांचा हा परिणाम होय. या लेखात स्त्री-स्त्री संघर्षाचा विचार करताना पितृसत्ताक रचना, सामाजिक संस्कार, संसाधनांची असमानता, मानसिक जडणघडण, तसेच माध्यमांच्या प्रभावाचा विचार केला आहे. त्याचबरोबर या संघर्षाच्या निराकरणासाठी काय उपाययोजना करता येतील हेही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. पितृसत्ताक रचना हेच संघर्षाचे मूळ पितृसत्ताक समाजात सत्ता, अधिकार आणि संसाधनांवर पुरुषांचे वर्चस्...