पोस्ट्स

प्रेम आणि सन्मान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नात्यात प्रेमापेक्षाही जास्त महत्त्वाचे काय आहे? | Healthy Relationship Truth

इमेज
 नात्यात प्रेमापेक्षा काय महत्त्वाचे आहे? | Healthy Relationship Truth प्रेम पुरेसं आहे का? नात्यांविषयी बोलताना आपण नेहमीच “प्रेम” या भावनेवर अधिक बोलत असतो. त्यावरच जास्त चर्चा करतो. एखादं नातं टिकण्यासाठी प्रेम असणं आवश्यक आहे, हे निर्विवाद आहे. मात्र नातं फुलण्यासाठी,ते टिकण्यासाठी नात्यात प्रेम असणं एवढंच पुरेसं आहे का? तर नातं कोणतंही असो त्यात केवळ प्रेम असणं पुरेसं नाही. अनेक नात्यांमध्ये प्रेमाची भाषा असते, एकत्र राहण्याची इच्छा असते , तरीही तिथे अस्वस्थता, दडपण,गुदमरलेपण असतं. त्यामुळे बाहेरून स्थिर दिसणारं नातं आतून तुटत चाललेलं असतं. अशा वेळी प्रश्न पडतो नेमकं काय कमी पडत आहे? आणि याचं उत्तर आहे सन्मान (respect) !! सन्मान: नात्याचा खरा पाया नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रेम महत्त्वाचं असतंच त्या शिवाय कोणतंही नातं निर्माण होत नाही किंवा फुलतही नाही , मात्र नात्याला टिकाऊ, निरोगी, निकोप, आनंदी बनविणारा पाया म्हणजे आदर होय. प्रेम आहे तिथे सन्मान असतोच हे गृहीत धरलं जातं.  प्रेम, आदर या गोष्टी वरकरणी एकमेकांशी जोडलेल्या वाटतात, परंतु त्यांतील फरक समजून घेतल्य...