पोस्ट्स

प्रेरणादायी कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संकल्पनांच्या लोहगाठी | मराठी कविता

इमेज
जगण्याच्या  संकल्पनाच्या लोहगाठी सोडून उडवून दिल्या तू वाऱ्यावर काटेसावरीच्या बिया प्रमाणे तेव्हा कळलं  जगण्याचं परिघ किती विशाल असतं आभाळाएवढं असू शकतं अजूनही काही या शक्यतांच्या शक्यता चमकून गेल्या मेंदूत  काजव्याची वीज होवून समृद्ध आणि मुक्त  जगाचं सृजन होत राहातं तुझ्या मेंदूत  मी ही सुखावून जाते अन् आश्वस्थ होते हे स्वप्न तुझ्या शब्दांना सोपवून छाया बेले