संकल्पनांच्या लोहगाठी | मराठी कविता





जगण्याच्या 
संकल्पनाच्या लोहगाठी
सोडून उडवून दिल्या तू
वाऱ्यावर

काटेसावरीच्या बिया प्रमाणे

तेव्हा कळलं 
जगण्याचं परिघ किती
विशाल असतं
आभाळाएवढं

असू शकतं अजूनही काही
या शक्यतांच्या शक्यता
चमकून गेल्या
मेंदूत 
काजव्याची वीज होवून
समृद्ध आणि मुक्त
 जगाचं सृजन
होत राहातं तुझ्या मेंदूत

 मी ही सुखावून जाते
अन् आश्वस्थ होते
हे स्वप्न तुझ्या शब्दांना सोपवून

छाया बेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .