मिमी मला खेळायला फोन तुझा हवा|बालकविता|
Date: Apr 11, 2020 मिमी , मला खेळायला फोन तुझा हवा नको बाळा, रानी जाऊ खाऊ रानमेवा डोंगर हा चढायला लावूया का शिडी चल, तुला दाखवते वाट नागमोडी बांध मग माझ्यासाठी ढगावर झुला ढग , रागवेल आणि भिजवेल तुला मिमी , मला आवडतो इंद्रधनू भारी सात रंग मिसळता होई जादुगरी फुले बघ बोलतात कानामध्ये काही प्रेमातच आहे मजा भांडणात नाही ©️®️छाया बेले✒️