मिमी मला खेळायला फोन तुझा हवा|बालकविता|

Date: Apr 11, 2020
मिमी , मला खेळायला फोन तुझा हवा
नको बाळा, रानी जाऊ खाऊ रानमेवा

डोंगर हा चढायला लावूया का शिडी
चल, तुला दाखवते वाट नागमोडी

बांध मग माझ्यासाठी ढगावर झुला
ढग , रागवेल आणि भिजवेल तुला

मिमी , मला आवडतो इंद्रधनू भारी
सात रंग मिसळता होई जादुगरी

फुले बघ बोलतात कानामध्ये काही
प्रेमातच आहे मजा भांडणात नाही

©️®️छाया बेले✒️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .