पोस्ट्स

बालसाहित्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 लुकाछुपी!! भाग ७

इमेज
            बोल्ट्याची ब्लँकेटमधली लुक्काछुप्पी बोल्ट्याच्या मजेदार किस्स्यांपैकी अजून एक किस्सा सांगते बरं का! आमच्या घरात एक गंमत आहे. घरात कोणीही नवीन कपडे घातले की आमचा बोल्ट्या सगळ्यात जास्त खुश होणारा! तसा घरात कोणतीही नवीन वस्तू आली, किंवा सणवार असेल, कुठला खुशीचा माहौल असेल, तर घरात सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो माहितीये? तर आमच्या बोल्ट्यालाच! मी जर नवीन साडी नेसले ना, की झालंच! हा गोल गोल फिरणार, उंच उंच उड्या मारणार आणि मला पुरतं भंडावून सोडणार! कधी माझ्या साडीभोवती प्रदक्षिणा घालणार, तर कधी साडीचं टोक तोंडात पकडून हलकेच ओढणार! जणू म्हणणार, "वा! काय छान साडी आहे! मला पण दाखव, मला पण दाखव!" पण कपड्यांच्या आवडीबद्दलचा सगळ्यात भारी किस्सा म्हणजे थंडीच्या दिवसातला! थंडी वाजली की हा काय करायचा माहितीये? घरात जो सगळ्यात मऊ, लुसलुशीत ब्लँकेट असेल, त्यात हा हळूच शिरायचा! आणि मग आतल्या आतच... इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरायचा! तेही असा काही बहाणा करायचा की बघणाऱ्याला खरंच वाटावं, अरेरे! हा बिचारा चुकून आत शिरलाय आणि आता त्याला...

🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 पुलावासाठी बोल्ट्याग्रह | भाग ५

इमेज
    बोल्ट्याचा बोल्ट्याग्रह ! खरं सांगायचं तर बोल्ट्याला आम्ही आणत असलेलं त्याचं गवत, ताज्या भाज्या, गाजर, काकडी, टोमॅटो यापेक्षा आमच्या स्वयंपाकघरात जे शिजायचं तेच जास्त आवडायचं. आमच्या ताटातला गरमागरम पोहे, कांदे पोहे, रव्याचा मऊ उपमा, वाफाळता पुलाव, फुगलेली चपाती - त्याला हेच हवं असायचं. त्याचं ताट बाजूला असायचं आणि आमचं ताट त्याच्या नजरेत! एकदा घरी साबुदाणा खिचडी केली होती. शेंगदाण्याच्या कुटाचा तो खमंग वास. हा नेहमीप्रमाणे धावत आला. त्याचा हट्ट सुरू. मी नाही म्हटलं, हाताने अडवलं, पण त्याचं ते इवलं-इवलं तोंड, भुकेने आणि हट्टाने भरलेले ते काळेभोर डोळे बघवले नाहीत. शेवटी "थोडंसं काय होतं" म्हणून थोडीशी खिचडी दिली. आणि त्या रात्री आमची झोपच उडाली. रात्रभर तो खोकत होता. खुक... खुक... असा बारीक, घशात काहीतरी अडकल्यासारखा आवाज. बहुतेक चिकट साबुदाणा त्याच्या नाजूक घशात चिकटला असावा. आम्ही दोघांनी त्याला मांडीवर, कुशीत घेऊन ती अख्खी रात्र जागून काढली. त्याच्या पाठीवरून हळुवार हात फिरवत होतो, पाणी देत होतो. त्याचा प्रत्येक खोकला आमच्या छातीत धडकी भरवत होता. पहाटे-पहाटे...

🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇चाय की रोचक कहानी!!भाग सहा

इमेज
बोल्ट्याचा चहा ! बोल्ट्याला त्याच्या खाण्याच्या गोष्टी सोडून बाकी सगळं आवडायचं असं म्हणणं चुकीचं होईल, त्याला खरं तर _आमच्यासाठी बनवलेलं जेवणच_ हवं असायचं! सकाळच्या नाश्त्यापासून त्याची घाई सुरू व्हायची. "मला हवं, मला हवं" म्हणून लहान मुलं जसा गोंधळ घालतात, अगदी तसाच गोंधळ आमचा बोल्ट्या घालायचा. मोठा आवाज नसला तरी, त्याच्या जीवाएवढा तो एक बारीकसा, गोड आवाज काढायचा. मुसमुस... मुसमुस... त्या मुसमुसण्यातूनही तो आपला भाव, आपली भूक, आपला हट्ट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात अगदी तरबेज होता.    त्यातही त्याला सगळ्यात जास्त आवडायचा तो म्हणजे - चहा! पण साधासुधा नाही, तर निरश्या दुधाचा! फिक्कट, पांढराशुभ्र, वाफाळलेला निरश्या दुधाचा चहा. काळा चहा, म्हणजेच ब्लॅक-टी, त्याला अजिबात आवडायचा नाही. त्याकडे तो ढुंकूनही बघायचा नाही.  ती एक सकाळ आठवते कोरोनाकाळ सुरू होता. प्रत्येक घरात तेव्हा काढा उकळत होता. हळद, आलं, तुळस, मिरीचा.  तो कडवट-कडू वास घराघरात दरवळत होता.  मीही नेहमीप्रमाणे काढयाचा कप हातात घेऊन बसले होते. अर्थात, बोल्ट्याचा नाश्ता-पाणी अगोदरच आटोपून! त...

🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 बोल्ट्याचा आजार ||१९

इमेज
🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇  - बोल्ट्याचा आजार बोल्ट्याला आणलं तेव्हा त्याची फर थोडीशी रुक्ष वाटत होती. थम्परसारखी मऊ, मुलायम नव्हती. पेटशॉपवर नीट काळजी न घेतल्याने असेल असं आम्हाला वाटलं, पण खरं तर त्याला कसला तरी त्वचाविकारच झाला होता. हळूहळू त्याच्या मानेवरची फर गळायला लागली. बघता बघता आठच दिवसांत मान आणि पाठीवरचे पूर्ण केस गळून गेले. आमचा तो गोंडस, क्यूट बोल्ट्या आता ओळखूही येत नव्हता. तो कोरोनाकाळ होता. सगळीकडे अफवांचं पीक फुटलं होतं. "पाळीव प्राण्यांपासून दूर राहा, त्यांच्यापासून कोरोना होतो" असे मेसेज सोशल मीडियावर सारखे फिरत होते. त्या मेसेजकडे बघून बोल्ट्या मनात म्हणत असेल, "करणी तुम्हा माणसांची अन् आरोप मात्र आम्हा मुक्या प्राण्यांवर!" घरातही चर्चा सुरू झाली. प्रतिकच्या पप्पांनी त्याला बोल्ट्याला नेऊन सोडायला सांगितलं. पण प्रतिक काही केल्या तयार होईना. त्याचा बोल्ट्यावर जीव जडला होता. एक दिवस पप्पा त्याच्यावर खूपच चिडले. मग प्रतिकने काय केलं माहित आहे का? त्याने बोल्ट्याला बास्केटमध्ये टाकलं आणि स्वतःचेही कपडे बॅगेत भरले! "बोल्ट्याला सोडणार ...

🐇बोल्ट्याच्या करामती 🐇 न आवडे मज पुस्तकें !! भाग दहा

इमेज
न आवडे मज पुस्तकें...हे  बोल्ट्याचं आवडतं वाक्य असावं ! जर आमच्या बोल्ट्याला बोलता आलं असतं, तर तो दिवसभर घरभर फिरत एकच वाक्य ओरडत राहिला असता -  "न आवडे मज पुस्तकें! न आवडे मज पुस्तकें!" आणि तो हे असं का म्हणाला असता, यामागे एक मोठ्ठी, मजेदार आणि थोडीशी दु:खदही गोष्ट आहे! खरं तर घरातलं एकही पुस्तक या बोल्ट्याने न कुरतडता सोडलेलं नाही. त्याला पुस्तकांचा इतका काय राग होता कोण जाणे! सुरुवातीला मला त्याचा हा विचित्र गुण अजिबात माहित नव्हता. मला वाटायचं, हे दोघे - बोल्ट्या आणि थम्पर - अजून अगदी इवलेसे आहेत. काय बरं खोड्या करणार? फार तर इकडे-तिकडे उड्या मारतील, गवत खातील, बस! एक दिवस असंच झालं. बाहेर मांजर घुटमळत होती. ती घरात येऊ नये म्हणून मी सगळ्या खिडक्या, दरवाजे बंद करून टाकले. आणि म्हटलं, चला आज आपल्या दोन्ही पिल्लांना घरात मोकळं सोडूया. त्यांनाही जरा घरभर फिरायला मिळेल. मी दोघांनाही बास्केटमधून बाहेर काढलं आणि मी माझ्या स्वयंपाकाच्या कामाला लागले. अर्ध्या तासाने मी खोलीत आले आणि जे दृश्य पाहिलं, त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली! आश्चर्याचा मोठा धक्काच बसला मल...

🐇बोल्ट्याच्या करामती 🐇 हटकून कळ अन् शेपटी वळवळ भाग९

इमेज
हटकून कळ अन् शेपटी वळवळ! 'हटकून कळ अन् शेंडी वळवळ' - विनाकारण खोड्या करणाऱ्या खोडकर लेकराला असं म्हणतात, हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. ही म्हण आमच्या बोल्ट्यासाठी अगदी फिट बसते! फक्त त्याच्यासाठी त्यात एक छोटासा बदल करावा लागेल - 'हटकून कळ अन् शेपटी वळवळ!' आणि हो, तुम्हाला वाटेल विनाकारण खोड्या? नाही, नाही... अजिबात विनाकारण नाही! त्यामागे त्याचं ठरलेलं कारणच आहे! आम्ही जेव्हा भिंतीला टेकून बसलेलो असायचो, तेव्हा हा महाराज पाठीमागून ये-जा सुरू करायचा. आता तुम्ही म्हणाल, यात कसला आला खोडकरपणा? पाठीमागून फिरणं तर साधी गोष्ट आहे! ते खरंही आहे. पण यातच खरी गंमत दडली आहे! तो पाठीमागून फिरायचा खरा, पण नुसता नाही फिरायचा. इकडून तिकडे जाताना आमच्या पाठीला एकदा त्याच्या सुईसारख्या तीक्ष्ण दातांनी अलगद चावा घ्यायचा! आणि तिकडून परत येताना पुन्हा एकदा... चावा! पहिल्यांदा आम्हाला वाटलं, चुकून लागला असेल बिचाऱ्याचा दात! पण नाही! दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा... प्रत्येक फेरीला ठरलेला एक चावा! मग कळलं, हा तर मुद्दाम करतोय! हा काही चुकून नाही, हा तर ठरवून चावतोय! आम्ही भिंतीला टेकू...

🐇बोल्ट्याच्या करामती 🐇 भुडू नकोsss. / भाग तीन

इमेज
    आम्ही बोल्ट्या आणि थम्परला घरी आणलं, तेव्हा दोघेही अगदी मळलेले होते. धुळीने माखलेले, केसात काडीकचरा. म्हटलं, आधी यांना आंघोळ  घालून स्वच्छ करू.  डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून मग मी खास बेबी शॅम्पू आणला. म्हटलं, बाळच आहेत ही आपली! पहिला नंबर थम्परचा. अंगावर  घातलं तशी तिने आधी थोडी पळापळ केली. "मला नको आंघोळ, मला नको!" असा लहान मुलासारखा हट्ट करून पाहिला . पण जेव्हा कळलं की पळून काही उपयोग नाही, तेव्हा अगदी आज्ञाधारकपणे  गपगुमान उभी राहिली. आम्ही शॅम्पू लावला, पाणी घातलं. ती निमूटपणे सगळं सहन करत होती. आंघोळ झाली. आता आला  आमच्या हिरोचा नंबर - म्हणजेच लबाड बोल्ट्याचा! याला पकडून बाथरूममध्ये नेलं आणि खऱ्या धिंगाण्याला सुरुवात झाली. एवढासा जीव, मुठभर आकार,  ताकद आणि चलाखी आकारापेक्षा खूप जास्त! आम्ही त्याला पकडायला जावं, तो बाथरूमच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सुसाट! जणू मोठा उंदीरच पळतोय असा भास. पकडलं तर टोकदार नखांनी ओरबाडून काढायचा आणि पुन्हा पळ! आम्ही दोघं - मी आणि माझा छोटा मुलगा आम्हाला - त्या मुठभर प्राण्याने...

बोल्ट- घरी आला तेव्हा - भाग एक

इमेज
आमचा बोल्ट्या आला तेव्हा... हा जेव्हा घरी आला तेव्हा... खरं सांगू? तो ससाही नव्हता, बाहुलाही नव्हता. तो होता माझ्या तळहातावर अलगद मावेल एवढासा जीव! मी दोन्ही हाताची ओंजळ केली, तर त्या ओंजळीत तो गपगार बसे. इतका छोटा की मला भीतीच वाटायची, जोरात श्वास घेतला तर कुठे उडून जाईल की काय! आणि त्याचे डोळे... अरे बापरे! त्याचे डोळे  काचेच्या दोन लहानशा गोट्या कोणी त्याच्या चेहऱ्यावर चिकटवल्यात असं वाटायचं. पाणीदार, काळेभोर, सारखे लुकलुकणारे. जेव्हा तो माझ्याकडे बघायचा, तेव्हा वाटायचं जणू दोन छोट्या काचेच्या गोटया ठेवल्यात ! त्या लुकलुकत्या डोळ्यांमागे, अगदी पिंगपॉंगच्या चेंडूवर छोटासा चेहरा चिटकवावा, तसा त्याचा चेहरा. 'गोड', 'क्यूट', 'छान' हे सगळे शब्द त्याच्यापुढे फिके पडतील. इतका गोड की पाहताच एकदम गुदगुल्या व्हाव्यात मऊ. डोक्यावर दोन लांब, मऊ-मऊ कान.    त्याचे कान सारखे टवकारलेले. कधी उजवीकडे, कधी डावीकडे - सारखं काहीतरी ऐकत असल्यासारखे. आम्ही हळूच "बोल्ट्या..." म्हणालो तरी ते कान एकदम ताठ व्हायचे! आणि मिशा? मांजराला असतात तशा बारीक, पांढऱ्या काळ्य...