पोस्ट्स

बुद्ध विचार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फुटलेली बरणी : अनित्यतेचा स्वीकार व जगण्याचा अर्थ .

इमेज
फुटलेली बरणी : अनित्यतेचा स्वीकार व जगण्याचा अर्थ         आज सकाळी सकाळी नाश्ता बनविण्याच्या घाईत हातातून निसटलेल्या मिठाच्या बरणीचे फरशीवर तुकडे तुकडे होऊन विखुरले. मला त्या बरणीचं झाकण खूप आवडलं होतं, म्हणून मी तिला खूप जपत होते. ती एका क्षणात काचेच्या असंख्य तुकड्यांत रूपांतरित झाली . हळहळ करीत सगळ्या काचा भरून कचऱ्यात टाकल्या. पण त्या काचाही टाकाव्याशा वाटत नव्हत्या. त्या सुंदर झाकणाला मिनिटभर हातात घेऊन निरखत राहिले. खरं तर त्या झाकणामुळेच ती बरणी घेतली होती. आता झाकण हातात होतं, पण ज्यासाठी ते होतं ती बरणी नव्हती. काही गोष्टींचं असंच असतं. आपण ज्या गोष्टीवर जीव लावतो, तीच एखाद्या क्षणी हातातून निसटून जाते. मागे फक्त आठवणी उरतात आणि हातात काहीच राहत नाही. अशा कितीतरी बरण्या क्षणात फुटून काचेत रूपांतरित होतात. त्यात नेहमी मीठच असेल असं नाही. कधी त्यात छोटी छोटी सुंदर स्वप्नं असतात. मनाच्या कप्प्यात अलगद अनेक वर्षे जपून ठेवलेली. कधी त्यात नाजूक भावना असतात. एका चुकीच्या शब्दानेही तडकणाऱ्या. कधी आपण ठरविलेली ध्येयं असतात. त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट असता...

एक दिन मैं भी बुद्ध हो जाऊँ | कविता

इमेज
बुद्ध को पढूंं, बुद्ध को जिऊं अपने भितर सोए  बुद्ध को जगाऊं सोचती हूं एक दिन मैं भी बुद्ध हो जाऊं बुद्ध की क्रांति, बुद्ध की शांती बुद्ध की करूणा को  मन में भर लाऊं सोचती हूं एक दिन मैं भी बुद्ध हो जाऊं बुद्ध की शिक्षा, बुद्ध की दिक्षा अतः दीप होकर भितर का  अंधियारा मिटाऊं सोचती हूं कि एक दिन मैं भी बुद्ध हो जाऊं विकारों से मुक्ति , सुख दुःख परे जाऊं खुद को ही हराकर,  खुद पे विजय पाऊं सोचती हूं कि एक दिन मैं भी बुद्ध हो जाऊं छाया बेले.