पोस्ट्स

भोंदू बाबा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महिलाच भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? | अंधश्रद्धेचं सामाजिक वास्तव

इमेज
भोंदूबाबांच्या जाळ्यात जास्तीत जास्त महिलाच का अडकतात?अंधश्रद्धेचं सामाजिक वास्तव!      सध्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला एका विकृत बाबाच्या विकृत कृत्यांनी हादरवून सोडले आहे. ज्या महाराष्ट्रात महामानवांनी, संतांनी अंधश्रद्धेचा अंधार संपविण्यासाठी कार्य केले त्या महाराष्ट्रात एका व्यक्तीने अंधश्रद्धेचा फायदा घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचं शोषण करावं ही माणुसकीला, समाजाला काळीमा फासणारी घटना आहे.  असंही बोललं जातंय की यात तथाकथित प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या घरातील महिलांचा समावेश आहे.  इथे प्रश्न पडतो की, महिलाच अशा जाळ्यात का अडकतात? जाळं बाहेरचं आहे की त्यांच्या आतच ते निर्माण केलं जातं? की अजून काय कारणं असू शकतात? या प्रश्नांची  उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.      मानवी जीवनात श्रद्धा ही केवळ धार्मिकता या भावनेपुरती मर्यादित नसून ती मानसिक स्थैर्य, आशा आणि आधाराचं साधन आहे. संकटात श्रद्धा माणसाला धैर्य देते, जगण्याचं बळ, प्रेरणा देते आणि अनिश्चिततेतही आशेचा किरण दाखवते. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा अ...