पोस्ट्स

महाराष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोतराज प्रथा समाजातील विघातक प्रथा | मराठी लेख

इमेज
   पोतराज प्रथा : समाजातील विघातक प्रथा.          महाराष्ट्रात आजही परंपरेच्या नावाखाली टिकून असलेल्या काही प्रथा समाजाला पुढे नेत नाहीत, तर मागे खेचतात. पोतराज ही अशीच एक प्रथा आहे . नुकताच एका चॅनेलवर अशा 'कायर' उत्सवाचा  व्हिडिओ पाहण्यात आला. यात  श्रद्धेच्या नावावर माणसाचे माणूसपण हिरावून आणि मूक्या जीवांचा बळी दिला जातो. कोणतीही प्रथा का निर्माण झाली कोणी केली याचा शोध घेण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या गुहेत जाऊन सत्य शोधून काढता येईल. पोतराज हा देवीचा भाऊ, देवीचा रक्षक अशा मान्यता या प्रथेचे समर्थन करणाऱ्या लोकांत दिसून येतात. या मान्यता मातृसत्ताक संस्कृतीची खुण असु शकते. मातृसत्ताक काळातील कर्तृत्ववान राज्यकर्त्या स्त्रियांना केवळ देवाची पत्नी म्हणून देवी करून मंदिरात बसविले . व त्यांच्याशी संबंधित गोष्टींचे , त्यांच्या समर्थकांचे विकृतीकरण केले गेले.  यापैकी पोतराज हे मातृसत्ताक, मातृवंशाचे वारस वाहक असं मानलं तरी, आजच्या काळात ही प्रथा अपमान , उपेक्षा,  दारिद्र्य याची वाहक  आहे.  अर्थातच अशा प्रथा शोषका...