पोस्ट्स

महिला हक्क लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आधुनिक दास्याचे अदृश्य स्वरूप : आर्थिक वास्तव आणि स्त्रीची अपूर्ण मुक्ती (भाग ३)

इमेज
  आधुनिक दास्याचे स्वरूप : आर्थिक वास्तव आणि स्त्रीचं अपूर्ण स्वातंत्र्य (भाग ३)           स्त्रीच्या स्वातंत्र्याचा विचार करताना आपण अनेकदा शिक्षण, पैसे कमावणे,या घटकांवर भर देतो; स्त्री कमावते आहे, पण ती खरोखरच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? सखोलपणे विचार केला, निरिक्षण केले तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंच येईल. या प्रश्नाच्या उत्तरात आधुनिक दास्यप्रथेचं एक अत्यंत सूक्ष्म, अदृश्य रूप दडलेलं आहे.   आर्थिक स्वातंत्र्य की अदृश्य दास्य? आजची स्त्री उघड गुलामगिरीत नाही, परंतु तिच्या आर्थिक स्वातंत्र्यावर असलेल्या मर्यादा तिच्या या दास्य उघड करतात. निर्णय घेण्याच्या अधिकारावर असलेली बंधनं अस्तित्वाला अप्रत्यक्षरीत्या नियंत्रित करतात. हे नाकारून चालणार नाही. आजची महिला पुर्णपणे मुक्त आहे असं म्हणण्यात केवळ दांभिकपणाच दिसून येतो.   कामाच्या संधी आणि सामाजिक वास्तव सामान्यपणे महिलांच्या बाबतीत कामाच्या संधीत क्षमतेपेक्षा परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. महिलांना कमी समजण्याची मानसिकता दिसून येते. आधुनिक समाजात स्त्रिया शिक्षणाच्या क्षेत्रात ...