प्रेम- पैसा - प्राण : एका घटने पलिकडचे वास्तव
प्रेम- पैसा - प्राण आज सकाळी नवऱ्याने व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ पाठवला. त्यात एक नवविवाहित जोडपं उंच टेकडीवर नाचत होतं. त्यांच्या भोवती चार-पाच बंदूकधारी उभे होते. त्यावर लिहिलं होतं – "आजच्या असुरक्षित काळात सुरक्षित हनीमून!" आणि सोबत काही हसणारे इमोजी होते. अजून एका स्टेटस वर आती क्या खंडाला याचं उत्तर तीच्या शब्दात चलता क्या लोहगड असं तयार केलेला फोटो होता. लोहगडावर घडलेल्या एका नियोजित वधूने व तिच्या प्रियकराने कट रचून होणाऱ्या नवऱ्या मुलाला कड्यावरून ढकलून हत्या घडवून आणली. जो तिला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत होता, याची चर्चा करणारे शेकडो व्हिडिओ माध्यमातून फिरत आहेत. दुर्दैवी घटनेनंतर समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे अनेक विनोद, मीम्स आणि संदेश फिरताना दिसत आहेत. त्या व्हिडिओकडे पाहताना मनात प्रश्न आला आपली संवेदनशीलता इतकी बोथट झाली आहे का की एखाद्या कुटुंबाच्या अपरिमित दुःखावरही आपण विनोद करू लागलो आहोत? त्या घटनेची बातमी वाचून सुन्न झालं . चार-पाच दिवस नीट झोप लागली नाही. त्या ...