पोस्ट्स

मानसिक आरोग्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कुटुंबातील भावनिक अंतर : एकाच घरात राहूनही दूर होत चाललेली माणसं

इमेज
कुटुंबातील भावनिक अंतर : एकाच घरात राहूनही दूर होत चाललेली माणसं            जगाच्या पाठीवर आपलं घर असणारी व्यक्ती भाग्यवान समजायला हवी.‌ घराचं महत्व त्यांना माहीत असतं ज्यांचं कुठेही घर नाही. मात्र ज्यांना घर आहे त्यात घरपण असेलच असे नाही.    ' घर ' या शब्दाचा अर्थ  केवळ दगड विटांच्या चार  भिंती असा होत नाही,  घर म्हणजे जगाच्या पाठीवर आपलं हक्काचं सुरक्षित ठिकाण असतं. त्यात राहणाऱ्या माणसांमधील जिव्हाळा, संवाद, समजूतदारपणा आणि भावनिक आधार या गोष्टी घराला घरपण देतात. घर ही अशी जागा असते, जगात कुठेही गेलो, पद, प्रतिष्ठा, कितीही मान मरातब मिळवला तरीही मनाला कायम घरी परतण्याची ओढ असते. घर अशी जागा असते जिथे आपण सुखाची झोप घेऊ शकतो. हे घरपण अलिकडे खिळखिळं होत चाललं आहे.       पूर्वी कुटुंबातील  सर्व लहान मोठी माणसं एकमेकांशी प्रत्यक्ष जोडून होती.   सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे, एकत्र बसून मनमोकळ्या गप्पा व्हायच्या, खळखळून हसायचे, खरा हृदय संवाद व्हायचा.  सगळं आलबेल होतं असं ...

सुशांतच्या निमित्ताने: आपण खरंच जगतोय का? | गर्दीतलं एकटेपण आणि संवादाची गरज

इमेज
     सुशांतच्या निमित्ताने : आपण खरंच जगतोय का? चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अचानक जाण्याने समाज हळहळला. तो यशस्वी होता, प्रसिद्ध होता, श्रीमंत होता, बुद्धिमान होता. तरीही तो आतून तुटला होता. त्याच्या जाण्याने एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घर करून राहिला आहे. माणसाला जगण्यासाठी यश आणि पैसा एवढंच पुरेसं आहे का? उत्तर आहे नाही. आपण आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काहीतरी मिस करतोय. आत्महत्या करणारा कमकुवत असतो, भेकड असतो असं म्हणून आपण त्या घटनेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हे पळवाट आहे. हे का होतंय याचा विचार सर्वांनीच करायला हवा. कारण दुसऱ्यावेळी हा सुशांत आपल्या जवळचाच कुणीतरी असू शकतो. आपला शेजारी, आपला मित्र, आपल्या घरातलं कुणीतरी. आपला मानव समूह आज कडेलोटाच्या मार्गावर उभा आहे असं वाटतंय. जागतिकीकरणाच्या काळात जग जवळ आलंय, पण माणूस एकटा होत चाललाय. हातात मोबाईल आहे, फेसबुकवर हजारो मित्र आहेत, पण मनातलं सांगावं असं एकही हक्काचं ठिकाण नाही. तंत्रज्ञानाच्या जाळ्यात माणूस फसत चाललाय. जेव्हा तो त्या जाळ्यातून उसंत घेऊन बाहेर येतो, तेव्हा आजूबाजूला फक्त भयाण ...