पोस्ट्स

रसग्रहण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परिस्थितीचं भेसूर तोंड... // रसग्रहण

इमेज
परिस्थितीचं भेसूर तोंड... भाकरीच्या दूल्डीतले कुटके आर्धे उंदरायनं कतरले तं राहेल आर्ध्यावर  लेकरं ध्यान ठेवून हे. चाळणी होयेल दूल्डीतून भाकर झाकणारं उपरणं आर्ध दूल्डीत तं आर्ध भुयीवर टेकू राह्यलं मांजरीनं डोळे लावून प्यावं दूध आशीच गत मही बी झालीय भामट्यावानी.. घरातलं तेल, मिठ, पिट, आटल्यानं बायकूची हाय खचली तीचे खोल जायेल डोळे मला, आटत जाणार्या ईहिरीवानी दिसू राह्यले  घरात मुंगीला मुताचा पूर झालाय लेकरायची भाकर भेटन हे सपनं पाहणारी नादान नजर  टोचू राह्यली काळजाला आरपार.. परिस्थितीचं भुताडावानी हे भेसूर तोंड आझूनच भेसूर होत चाललंय दिवसेंदिवस...  किशोर त्रिंबक भालेराव जालना 9168160528 ==================================     देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्ष उलटून गेली  . संविधान लागू होवून पाऊणशे वर्ष पूर्ण झाली तरीही   देशातील सामान्य जनतेच्या भुकेचा प्रश्न सुटलेला नाही . महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर  अण्णा भाऊ साठे यांच्या स्वप्नातील भारत अजुनही साकरलेला नाही. याचं कारण इथली जातीव्यवस्था,इथले स्वार्थाचे राजकारण...

डॉ. रेषा यांच्या ' पृथ्वीची मुले ' या कवितेचं रसग्रहण

इमेज
*पृथ्वीची मुले...* दिवस रिता नसतोच, मी चाचपडतेय दिशादिशांतून सहिष्णुता‌. भेगाळलेल्या भिंती शाकारण्यासाठीच झाला असतो जन्म माझा. आवडत नाही मला जीवनातील बेपर्वाई... शब्द कारागिरी करतील उद्या तेव्हा सहिष्णुतेची गोष्ट पुढे येईल - रांगत येणारी पृथ्वीची मुले सहिष्णुतेचं बोट धरतील, पेरलं की उगवतंच, अनाठायी असं काहीच नसतं वातावरणात... आपला भोग, योग असतो दिशांचा मग न डगमगता चालत जातो आपण... खरे तर अडकवतोय काळ आपल्याला भ्रमाच्या जाळ्यात, आपलं सच्चेपण ओळखायला. समोर आलेल्या गुंत्याला गुंता म्हणू नये कधी काटे फुलांना सांगतात की आम्ही तुमच्या सुरक्षिततेसाठी आहोत, घाबरू नका... आता, आयुष्याच्या या उतरणीवर  थोडं ज्ञान झालं की  जीवन बदलणार आहे  जीवनमूल्यांची मांदियाळी  जग उजळून टाकणार आहे.  - रेषा     पुढ्यात येऊन उभं राहिलेलं वर्तमानाचं वास्तव संवेदनशील मनाची घालमेल करणारं  , अस्वस्थ करणारं आहे. माणसाच्या जगात माणूसच गौण ठरत आहे. जात, धर्म, पंथ  एवढे टोकदार झाले आहेत की माणसाचं अस्तित्व कोणीतरी ज्वालामुखीच्या तोंडावर ठेवून द्यावे असं झालेलं आह...

रचनाच्या कवितेचे रसग्रहण !!

इमेज
रचना यांच्या कवितेचे रसग्रहण !! सकाळी सकाळी गुलाबजलची बाटली साफ करण्यासाठी सवयीनं लिक्विड सोप ओतलं प्रत्येक बाटली साफ करताना वापरतात तसं अन काळजात चर्रर्र झालं ... गुलाबाच्या मंद सुगंध  मिटविण्यासाठी रसायनाचा वापर अगदी खूप सारं प्रेमाच चॅट  डिलीट फॉर एव्हरीवन किंवा क्लिअर चॅट  केल्यासारखं गुलाबाचा सुगंध संपूर्णतः मिटवण्याचा प्रयत्न ... इतके कृतघ्न आपण स्वतःचा आत्मा  डिजीटल करून घेताना नैसर्गिक गुलाबी सुगंध कायमचा निकालात काढत सेंद्रियत्व हरवून आम्ही होतोय रासायनिक  मुळासकट साफ करत व्हाईट कॉलर क्लिअर  अन डिजिटल एका क्लिकवर  माणसा सकट सारंच डिलीट करत भावनाशून्य होत ... करतोय का आम्ही आमचं जगणं सुकर की होतोय  दिवसेंदिवस मनोरूग्ण ... 🖍️ रचना दि. १६ / ७ / २०२४         सध्याचा काळ हा एवढ्या वेगाने धावतोय की बघून उर दडपून जातो . या पंचवीस वर्षांत म्हणजे मोबाईल फोन आल्यानंतर त्याचे  मानवी जीवनावर झालेले परिणाम कवयित्री रचनाने अगदी अचूकपणे टिपले आहेत . आपण मुकाटपणे सोसत  असलेलं दुखणं कोणीतरी लक्षात आणून देतं ते...

लोककवी श्रीनिवास मस्केच्या कवितेवरील रसग्रहण!!

इमेज
टिचल्या मातीला आभाळ देऊ ……………………… सावल्या उन्हाळल्यात  चल थोडा विसावा घेऊ  खूप कोलाहल आत  टिचल्या मातीला आभाळ देऊ  पोटऱ्यात कणीस भरलं ही नव्हतं नीट शेरडामागं फिरणारे पाय  बांधले खुट्याला  वेलीवरचं फुल गळून पडलं चूल ..शेत.. गोठा ..नदी  आता साथीला… चल थोडं माथ्यावर  दूरून गाव बघू  घर घर घर नुस्ती घरघर आरसा ही बोलत नाही  चेहऱ्यावर घामाची पाहून वल  परकलातल्या दोन वेण्या हरवल्या परक्या घरी सांगल कुणाला सल कोंडलेल्या श्वासाला चल मोकळा वारा देऊ…. ना पोर्णिमेचा चंद्र आला  कसली काय चंद्रमिठी  जागलीला शेतात तो  घरात हिरमुसलेली वटी ताटात भरीत अण् धरलेल्या सटी चल मोकळ्या आभाळाला  एक रात्र देऊ …. दगदगीत जिंदगी आली काठला लेकरांच्या स्वप्नातच जीव गुंतला खळखळणाऱ्या झऱ्याची लय  हिंदडण्या आधीच नदी झाली  चल थोडं ढग होऊन पुन्हा कोसळू  खूप कोलाहल आत  टिचल्या मातीला आभाळ देऊ … @श्रीनिवास सहज सुचलेले..       कविता ही एक सुंदर अभिव्यक्ती आणि गंभीर कृती आहे . कवी विश्वात्मा होवून सृष्टीच्या ...