पोस्ट्स

वारकरी संप्रदाय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वारी : भक्ती, समता मानवतेची शाळा | मराठी लेख

इमेज
 वारी : भक्ती, समता  मानवतेची शाळा  " जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया..."       वारकरी संप्रदायातील हा भावस्पर्शी स्वर केवळ अभंगातील शब्द नाही; तो लाखो वारकऱ्यांच्या अंतःकरणातील ओढ आहे. आपल्या विठू माउलीच्या दर्शनासाठी अनवाणी पायांनी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते त्याचे माहेर आहे. म्हणूनच दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक टाळ-मृदंगाच्या निनादात, अभंगांच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात पंढरीची वाट धरतात. संसाराचा गाडा ओढून दमलेल्या जीवावरचं सगळं ओझं उतरवून ठेवून मुक्तीची पताका खांद्यावर घेऊन पंढरिच्या वाटेवरून पावलं धावत सुटतात.     त्याच बरोबर सामाजिक दृष्टीने विचार केला तर, पंढरीची वारी ही केवळ धार्मिक यात्रा, किंवा उत्सव नाही; तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे.   शेकडो वर्ष सुरू असलेल्या वारीत संतांच्या विचारांचा अमूल्य वारसा, समतेची शिकवण, शि...