पोस्ट्स

विद्रोही कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शोषण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारी कविता : तूर्तास तरी

इमेज
शोषण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारी कविता : तूर्तास तरी कोणतीही कला असो, त्यात कलाकाराने भोगलेल्या सुखदुःखाचे प्रतिबिंब हे उमटलेलेच असते. ते त्याचे स्वतःचे असो की भवतालातील असो. कलाकार त्या आगीत स्वतःला झोकून देऊन होरपळत राहतो. भवतालातील वादळात गरगरत राहतो, घायाळ होतो. त्या वेदनेच्या प्रतिध्वनीतून अस्सल कलाकृतीचा जन्म होतो. कवितेचंही तसंच आहे. हाडाचा कवी हा कोणत्याही एका समूहाचा किंवा गटाचा असू शकत नाही. तो समतेचा, मानवतेचा पाईक असतो. सौंदर्याचा उपासक असतो. माणसामाणसातील भेदभाव, निर्माण झालेली दरी मिटवण्यासाठी समतेची पायाभरणी करीत असतो. शोषण व्यवस्था, तिने मानवतेचे केलेले विद्रूपीकरण थांबवण्यासाठी कवी स्वतःला सोलून घेत राहतो. मानवतेला अंतर्बाह्य सुंदर करताना कवी आपली हयात खर्ची घालतो. असाच मानवतेचा झेंडा घेऊन निघालेला कवी म्हणजे बुद्धभूषण साळवे. बुद्धभूषण मूळात संवेदनशील चित्रकार आहेत. त्यांचा "तूर्तास तरी..." हा कवितासंग्रह नुकताच हाती आला. समाज माध्यमांतून त्यांच्या कविता वाचनात आल्या होत्या. दर्जेदार वाचनाच्या तृप्तीचा आनंद देणाऱ्या त्यांच्या कविता असल्याने त्य...