पोस्ट्स

शेतकरी जीवन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पेरणी - शेतकऱ्याच्या संघर्षाची कहाणी |मराठी कथा

इमेज
// पेरणी // रोहिणी नक्षत्र थोडं झिरपलं. शेतकऱ्याला पेरणीचे वेध  लागले. सगळीकडे लालबुंद फुलासारखे किडे फिरू लागले. बाया सगळ्या त्यांना मृग घेऊन येणारे किडे म्हणून हळद कुंकू लावून पाऊस पडू दे म्हणून पाया पडू  लागल्या . "पाऊस पडतो मिरगा आधी रोहिणीचा  पाळणा हलतो भावा आधी बहिणीचा" पहाटे जात्यावर दळताना बाया ओव्या म्हणू लागल्या. सगळे शेतकरी  मृगाचा पाणी पडताच पेरणी करावी म्हणून सगळी तयारी करून बसले होते. सटवा आपली तीन गुंठे जमीन पेरण्यासाठी घरातील डाळ दाना विकून बी -बियाणे  घेऊन आला. तर  नामूनं एकरभराच्या पेरणीसाठी बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून बियाणं आणलं. शेवंता बरेच दिवस आदळआपट करीत राहिली . मात्र तिलाही कळत होतं दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून मग काही दिवसांनी शांत झाली . महादुला पाच एकराची पेरणी करायची होती. म्हणून त्यांन सोयाबीन न वीकता तसंच लावून ठेवलं होतं पेरणीसाठी. ते सोयाबीन कुंभाराच्या गाढवावर लादून सावकाराकडं घेऊन गेला सावकारांन वजन काटा केला. आता भाव पडलाय म्हणून अर्ध्या किमतीत सोयाबीन घेतलं. महादुला हळूहळू आपला जीव कोणीतरी काढून ...