पोस्ट्स

सण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आठवणीतील होळी : रंग जेव्हा नैसर्गिक होता

इमेज
    आठवण  होळी सणाची ! होळी हा आमच्यासाठी फक्त सण नव्हता, तो ऋतू बदलाचा उत्सव होता.  तो पुरणपोळीचा सण होता. होळीच्या पूजेसाठी पुरणपोळीचा निवद असायचा .  या दिवसांत शेतातील कामं आवरतीला आलेली असायची. रब्बीच्या पिकाची काढणी झालेली, खळ्यावर धान्याच्या राशी पडलेल्या असायच्या, सोबतच  बैलगाड्या भरभरून कडबा घरी यायचा. उंचच उंच बनमी रचल्या जायच्या. शेत मोकळं झालं की माणूसही मोकळा व्हायचा.  नेमकं त्याच वेळी अग्नीचा रंग लेवून पळस फुलायचा.    लालभडक, केशरी पळस. डोंगर माथ्यावर जागोजागी चुलीतील पेटत्या इंगोळाचा ढीग ठेवून दिला असं वाटायचं.पळसाचं फुलणं हेच होळीच्या येण्याचं पहिलं, निसर्गाने दिलेली सुचना असायची. सगळी लहान लहान पोरं रानातून घरी येताना पळसाची फुलं घेऊन यायचे.  आठ दिवस आधीच छोट्या छोट्या टंबरेलात पळसफुलाचं रंगीत पाणी करून एकमेकावर टाकायचे. माझ्यावर कधी कोणी रंग टाकला नाही याचं कारण माझा बाबा म्हणजे आजोबा. लहान, थोरले सगळेच त्याला घाबरून रहायचे. त्यामुळे मी फक्त इतरांना रंग खेळताना बघितलेलं. त्या सुंदर रंगातून झालेली सुरवात मग चि...