पोस्ट्स

समाजव्यवस्था लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भय इथले संपत नाही- मराठी लेख

इमेज
भय इथले संपत नाही       दर ५३ मिनिटांत एका चिमुकलीवर अत्याचार होतो अशी बातमी नुकतीच वाचली. वाचत आलोय. आता हे सगळं इतकं वारंवार घडताना दिसतं, की ते सामान्य वाटू लागलं आहे. हीच सर्वात भयानक गोष्ट आहे. कारण जेव्हा एखाद्या समाजाला निरपराध चिमुकलीवर होणारा अत्याचार “नेहमीची घटना” वाटू लागते, तेव्हा त्या समाजातील माणसाचं माणूसपण, संवेदना मरायला लागलेली असते. ठिकाण, शहर वेगळं असतं, घटना सारखी असते, क्रौर्य सारखंच, क्रौर्य जिच्यावर घटित होतं तिची वेदना सारखीच असते.      प्रत्येक चिमुकलीवर होणारा अत्याचार आपला समाज बघतो. काही दिवसांसाठी संताप व्यक्त केला जातो. निषेध नोंदविला जातो. लेख लिहिले जातात. कविता लिहिल्या जातात. मेणबत्ती पेटवून मोर्चे काढले जातात. हाताशी असलेल्या सोशल मीडियावर राग व्यक्त केला जातो. फार तर त्या चिमुकलीची,मग त्या विकृत नराची जात तपासली जाते. मग जातीचे राजकारण. मग सत्तेचे राजकारण. आणि शेवटी निष्पत्ती काय? पुन्हा शांतता. पुन्हा विसर. पुन्हा पुढच्या घटनेची वाट पाहणारा समाज. पुन्हा एखादी घटना उजेडात येते. काही दिवस माध्यमांमध्ये त...