पोस्ट्स

सामाजिक अन्याय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अर्ध्या मानवसमुहा विरोधातील सर्वात मोठे कारस्थान .

इमेज
     अर्ध्या मानवसमुहा विरोधातील सर्वात मोठे कारस्थान  .      भारतीय समाजात स्त्रीविरोधी अन्यायांची चर्चा जेव्हा होते, तेव्हा बहुतांश वेळा शारीरिक हिंसा, हुंडा, कौटुंबिक छळ, लैंगिक अत्याचार किंवा सामाजिक निर्बंध यांसारख्या दृश्य अदृश्य  घटनांवर कधी बोलले जाते तर  जास्त वेळा दडपले जाते .  सर्वच प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करताही येणार नाही. मात्र या सगळ्या अन्यायाच्या मुळाशी असलेल्या कारणांवर चुकूनही बोलले जात नाही.  सर्व प्रकारच्या शोषणाला कारणीभूत असलेले व या सगळ्या गोष्टींचे आतून पोषण, करणाऱ्या मुळ कारणावर  त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या आणि पिढ्यान्‌पिढ्या पुढे पुढे सुरूच  असलेल्या अन्यायावर  मौन बाळगले जाते . ती गोष्ट  म्हणजे स्त्रीला मालमत्तेपासून पद्धतशीरपणे दूर ठेवणं. हीच गोष्ट  स्त्रीचं संपूर्ण आयुष्य आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित बनवते.   पुरूष सत्ताक व्यवस्थेने स्त्रियावर  हा अन्याय परंपरेच्या नावाखाली लादला व समाज मान्यताही मिळवून घेतली...