स्त्रीच्या आयुष्यात सासरची नाती श्रेष्ठ का मानली जातात? : पुरुषसत्ताक समाजरचनेचे वास्तव
स्त्रीच्या आयुष्यात सासरची नाती श्रेष्ठ का मानली जातात? : पुरुषसत्ताक समाजरचनेचे वास्तव भारतीय समाजात विवाहानंतर स्त्रीच्या जीवनातील सर्वच स्तरांवर खूप मोठा बदल घडून येतो. तिच्या आयुष्यातल्या सगळ्याच भूमिका बदलतात. माहेर हे तिच्या जन्माचं ठिकाण नसतं तर ते अस्मितेशी जोडलेलं असतं तेही बदलतं. तिच्या आयुष्यातील नात्यांचा क्रमही बदलून जातो. विवाहानंतर सासरकडील नात्यांनाच महत्त्व दिलं जातं. आता सासर हेच “तुझं खरं घर” असं सांगितलं जातं. ‘बाबूल का घर गोरी कुछ दिन का ठिकाना है’ असं म्हणून तिला आपल्या घरापासून वेगळं केलं जातं. ते दुय्यम ठरवलं जातं. यात तिच्या रक्ताच्या नात्याच्या रूपात व्यवस्थाच काम करते. ही केवळ भावनिक बाब नसून समाजरचनेत खोलवर रुजलेली एक संकल्पना आहे. पुढे एक प्रश्न असा आहे की माहेरच्या नात्यांपेक्षा सासरकडील नात्यांना श्रेष्ठत्व कसं आणि का मिळालं? पुरुषसत्ताक समाजरचनेचा प्रभाव या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण समाजातील सत्तासंबंध समजून घ्यावे लागतात. भारतीय पारंपरिक समाजव्यवस्था ही मुख्यतः पुरुषसत्ताक (पितृसत्ताक) आहे. या व्यवस्थेत सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स...