योगिराज वाघमारे : साहित्य व व्यक्तिमत्त्व
योगिराज वाघमारे : साहित्य व व्यक्तिमत्त्व समाजाला शहाणं करण्याचा उद्देश घेऊन साहित्य लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे सरांचं जवळपास संपूर्ण साहित्य अनेक वेळा वाचून झालं आहे. खरं तर अशा काही साहित्यकृती असतात की त्या साहित्यावर क्रिया- प्रतिक्रिया न देता त्यातील विचार आत्मसात करावेत . त्यापैकीच योगिराज वाघमारे सरांचं साहित्य आहे. योगिराज वाघमारे सरांची आणि माझी ओळख माझ्या पहिल्या कथासंग्रहाच्या वेळी झाली कथासंग्रहाला सरांचे प्रस्तावना घ्यायचे ठरले नंबर मिळून फोन केला एवढ्या मोठ्या साहित्यिकाला कसं बोलायचं याचं दडपण आलं होतं. प्रस्तावनेसाठी सरांना फोन केला. 'पाठवून द्या मी प्रस्तावना देतो महिला कथाकार खूप कमी आहेत तुम्ही कथा लिहीत आहात याचं खूप कौतुक वाटतं अभिनंदन लिहीत राहा ' सरांच्या या शब्दांनी माझं दडपण नाहीसं झालं. लगेच हस्तलिखिताचा झेरॉक्स करून सरांना पाठवून दिला .केवळ एक महिन्यात कथेच्या सूक्ष्म निरीक्षणासह दीर्घ अशी प्रस्तावना लिहून पाठवली माझ्यासारख्या नवलेखीकेसाठी हा अतिशय आनंदाचा...