पोस्ट्स

स्त्री संघर्ष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

साम्राज्ञी ते गुलाम: स्त्रीच्या अधोगतीचा प्रवास| भाग दोन | मराठी लेख

इमेज
पुढे स्त्रीचे जीवन अतिशय कठीण होत गेले. तिला वर निवडीचा अधिकार राहिला नाही. बालविवाह, लहान मुलींचे वयस्कर पुरुषांशी लग्न करून देण्यात येऊ लागले. त्यामुळे तरुण वयात मुली विधवा होत. त्यांना सांभाळण्याची तयारी माहेरच्यांची किंवा सासरच्या मंडळीचीही नसायची. स्त्रीचा पुनर्विवाह ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. या कारणांमुळे सतीप्रथा सुरू झाली. पतीच्या निधनानंतर तिची इच्छा नसतानाही जबरदस्तीने सरणावर बसवून हत्या करण्यात येत होती. त्या प्रथेचे उदात्तीकरण करण्यात आले व तिची मरणानंतर सती म्हणून पूजा करण्यात येऊ लागली. आजन्म अपमान सहन करीत जगण्यापेक्षा मेल्यावर तरी मान मिळावा, या इच्छेखातर काही बायका सतीच्या नावाने आत्महत्या करायला तयार होत असाव्यात. समाजात हुंडापद्धती रूढ झाली. तिला प्रतिष्ठा देऊन समाजमनावर रुजवले गेले. ही अनिष्ट प्रथा आजही भारतीय समाजात एक मोठी समस्या बनून राहिली आहे. लहानपणी पित्याच्या अधिकारात, तरुणपणी नवऱ्याच्या अखत्यारीत, म्हातारपणी मुलाच्या धाकात जिणे जगावे लागे व आजही ही परंपरा कायम आहे. मुलांवर पित्याचा अधिकार असल्याने मुलगी अर्भकाला जिवंत ठेवायचे की नाही, हे प...

धगितून चालते ती | पुस्तक परिचय

इमेज
  धगीतून चालते ती | पुस्तक परिचय     स्त्री ही साहित्य, कला यांच्या कायम केंद्रस्थानी राहिलेली आहे. अगदी अनेक महाकाव्य सुद्धा स्त्री या वर्तुळाभोवतीच रचली गेली आहेत . मात्र तिला कोणत्या स्वरूपात मांडले गेले हा मुख्य मुद्दा आहे.     कळलावी, घरफोडी, कुरघोडी करणारी, कुलटा, शिकलेली असेल तर ती स्वैर वागणारी , कुठल्याही जबाबऱ्या न स्विकारणारी अशाच प्रतिमा व प्रतिकातून स्त्री साहित्यातून भेटत आली आहे.      मात्र तिला खऱ्या रूपात समोर आणणे, तिचा संघर्ष, जिद्द, जिवनजाणीवा, जगण्यावरील तिची निष्ठा , तिचा स्वाभिमान , जिवनाला भिडण्याची उर्मी , तिच्याठायी असलेलं सत्व साहित्याच्यातून मांडणे इथल्या पुरुष सत्ताक मानसिकतेच्या साहित्यिकांना कधीच जमलं नाही.      मात्र  साहित्य सम्राट,  अण्णाभाऊ साठे यांनी  स्त्रियांना सन्मान देत  तिला तिच्या खऱ्या स्वरूपात मांडले.   नायिकांना नायका एवढ़च महत्त्व , तेवढंच महत्त्वाचं स्थान, मान त्यांनी आपल्या साहित्यातून दिला. अण्णाभाऊनी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या बाबत...