पोस्ट्स

स्त्री सक्षमीकरण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आधुनिक दास्याचे अदृश्य स्वरूप : आर्थिक वास्तव आणि स्त्रीची अपूर्ण मुक्ती (भाग ३)

इमेज
  आधुनिक दास्याचे स्वरूप : आर्थिक वास्तव आणि स्त्रीचं अपूर्ण स्वातंत्र्य (भाग ३)           स्त्रीच्या स्वातंत्र्याचा विचार करताना आपण अनेकदा शिक्षण, पैसे कमावणे,या घटकांवर भर देतो; स्त्री कमावते आहे, पण ती खरोखरच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? सखोलपणे विचार केला, निरिक्षण केले तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंच येईल. या प्रश्नाच्या उत्तरात आधुनिक दास्यप्रथेचं एक अत्यंत सूक्ष्म, अदृश्य रूप दडलेलं आहे.   आर्थिक स्वातंत्र्य की अदृश्य दास्य? आजची स्त्री उघड गुलामगिरीत नाही, परंतु तिच्या आर्थिक स्वातंत्र्यावर असलेल्या मर्यादा तिच्या या दास्य उघड करतात. निर्णय घेण्याच्या अधिकारावर असलेली बंधनं अस्तित्वाला अप्रत्यक्षरीत्या नियंत्रित करतात. हे नाकारून चालणार नाही. आजची महिला पुर्णपणे मुक्त आहे असं म्हणण्यात केवळ दांभिकपणाच दिसून येतो.   कामाच्या संधी आणि सामाजिक वास्तव सामान्यपणे महिलांच्या बाबतीत कामाच्या संधीत क्षमतेपेक्षा परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. महिलांना कमी समजण्याची मानसिकता दिसून येते. आधुनिक समाजात स्त्रिया शिक्षणाच्या क्षेत्रात ...

महिला दिन : उत्सव की स्त्रीमुक्तीचा अपूर्ण संघर्ष?

इमेज
महिला दिन : उत्सव की स्त्रीमुक्तीचा अपूर्ण संघर्ष? स्त्रियांनी आता माणूसपणाकडे वाटचाल करायला हवी,  याविषयी या लेखात चर्चा करणार आहोत.    तिच्या मुक्तीचा मूलभूत प्रश्न उत्सवांच्या गदारोळात हरवून जातो. दरवर्षी ८ मार्च आला की जगभरात महिलादिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सामाजिक माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो, स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो, विविध कार्यक्रम आयोजित केले जातात , स्त्रीशक्तीचे गुणगान केले जाते. कार्यालये, शाळा, संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये महिलांचा सत्कार केला जातो. परंतु या सर्व उत्सवांच्या गदारोळात एक अत्यंत मूलभूत प्रश्न बाजूलाच राहतो, आजही स्त्रीला समाजात पूर्णपणे “माणूस” म्हणून स्वीकारले गेले आहे का? स्त्रीच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो, तिच्या यशोगाथा सांगितल्या जातात, मात्र तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन खरोखर बदलला आहे का? अनेकदा स्त्री अजूनही आई, पत्नी, सून किंवा मुलगी या नात्यांच्या चौकटीतच मर्यादित दिसते. म्हणूनच आज स्त्रीमुक्तीचा खरा प्रश्न केवळ अधिकारांचा नाही, तर स्त्रीच्या माणूसपणाच्या स्वीक...