महिलांच्या अर्ध्या जगासाठी दासप्रथा अजुनही जिवंत आहे — प्रगतीच्या आडोशातील कटू सत्य (भाग १)
अजूनही प्रगतीच्या आडोशाला लपलेली कुरूपता म्हणजे महिलांच्या आयुष्यातील न दिसणारी दासप्रथा. माझ्या लिखाणाचा उद्देश एवढाच आहे की, मानवी समाजात स्त्री- पुरुष भेद नष्ट व्हावा. दोघांतील दरी कमी व्हावी. स्वातंत्र्य ,न्याय, समता, मानवता दोघांसाठीही आहे याची जाणीव निर्माण व्हावी. पुर्वीच्या काळात सर्वांसाठी दासप्रथा अस्तित्वात होती. आजच्या काळात ती नाही असं नाही. ती आता केवळ स्त्रीच्या जीवनाशी मर्यादित झाली आहे. ती स्त्रियांना दिलेल्या वागणुकीतून, त्यांच्यासाठी असलेल्या नियमातून उघड उघड दिसून येते. त्यासाठी संबोधनं तेवढी वेगळी वापरली जातात. लेक असताना वेगळे लोकसंख्या, पत्नी झाल्यावर वेगळ्या, वेगवेगळ्या भुमिका वेगवेगळे तुरूंग असं स्त्रीच जीवन आहे. या लेखात आपण याचा विविध अंगांनी विचार करणार आहोत. मानवजातीचा इतिहास हा सतत विकसित होत जाण्याचा, स्वतःला नव्याने घडवण्याचा इतिहास आहे. विज्ञानाच्या शोधांनी निसर्गातील अनेक गूढ उलगडली, तंत्रज्ञानाने वेळ आणि अंतर यांच्यातील मर्यादा कमी केल्या, शिक्षणाने विचारांना व्यापकता दिली, आणि अर्थ...