पोस्ट्स

स्त्रीदास्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

साम्राज्ञी ते गुलाम: स्त्रीच्या अधोगतीचा प्रवास - -भाग एक | मराठी लेख

इमेज
भाग १ : साम्राज्ञी ते गुलाम — स्त्रीच्या अधोगतीचा प्रवास       भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध असा वारसा म्हणजेच न्याय, समता व शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावं आणि ते हजारो वर्षे टिकून राहावं, ही अतिशय खेदाची बाब आहे. शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे भेदावर, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणं, हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात म्हणावी लागेल. आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता, तेव्हा आपल्या जन्माला फक्त माता कारणीभूत आहे, असा त्याचा समज होता. शेतीचा शोध स्त्रीनेच लावलेला असल्याने स्त्रियांमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे, अशी त्यावेळी मान्यता होती. त्यामुळे मातृसंस्कृतीत स्त्रियांचे वर्चस्व सर्वांना मान्य होते. स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती. तिला गणिका असे संबोधले जात होते. गणिका म्हणजे गणाची मालकीण, आपल्या जमिनीचे आपल्या कुलात समान वाटप करणारी गणराणी. आम्रपालीसुद्धा अशीच एक गणराणी होती. ती समानतेच्या लोकशाहीच्या तत्त्वावर शासन चालवत असे. त्यामुळेच गौतम बुद्धांनी अनेक राजपुत्रांच्या जेवणाचे निम...