पोस्ट्स

स्त्री- पुरुष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माणूसपणाचा अंतिम टप्पा | मराठी कविता

इमेज
ओळखीच्या टप्यात  असलेला तो  अचानक सावलीइतक्या  अंतरावर येवून म्हणाला . कशी आहेस? मी निरूत्तर अजून एक पाऊल मागे सरत  किंचित पुढे आलेला हात मागे बांधून पलिकडच्या किनाऱ्यावरून तो चालत राहिला मीही ओठावर आलेले उत्तर आत लोटून दिले चालत राहिले अलिकडच्या  किनाऱ्यावरून त्याच्या आतल्या पडझडीचे पडसाद त्याच्या शब्दांतून अधूनमधून जाणवलेले.. गहिवरून आले होते मीही दुःखाच्या सहवेदनेने त्याने विचारलेला प्रश्न अनेकदा आलेला माझ्याही ओठावर  वाटलं विचारावं कसा आहेस?  तोही  प्रश्न आतच दिलेला टाकून उत्तरासारखा तो एकाच अर्थाच्या प्रश्नाचे अनेक अर्थ तर काढणार नाही  या शंकेची पाल चुकचुकली होती आत कुठेतरी म्हणून.. त्याच्यातला "तो "ला अन् माझ्यातील "ती"ला अजून माणूसपणाचा अंतिम टप्पा टप्पा गाठायचा बाकी आहे !! ©® छाया बेले.