माणूसपणाचा अंतिम टप्पा | मराठी कविता


ओळखीच्या टप्यात
 असलेला तो 
अचानक सावलीइतक्या 
अंतरावर येवून म्हणाला

. कशी आहेस?

मी निरूत्तर

अजून एक पाऊल मागे सरत 
किंचित पुढे आलेला हात
मागे बांधून
पलिकडच्या किनाऱ्यावरून
तो चालत राहिला

मीही ओठावर आलेले
उत्तर आत लोटून दिले
चालत राहिले अलिकडच्या 
किनाऱ्यावरून


त्याच्या आतल्या पडझडीचे
पडसाद त्याच्या शब्दांतून
अधूनमधून जाणवलेले..
गहिवरून आले होते मीही
दुःखाच्या सहवेदनेने

त्याने विचारलेला प्रश्न अनेकदा
आलेला माझ्याही ओठावर 
वाटलं विचारावं

कसा आहेस?

 तोही  प्रश्न आतच दिलेला टाकून
उत्तरासारखा
तो एकाच अर्थाच्या प्रश्नाचे
अनेक अर्थ तर काढणार नाही 
या शंकेची पाल चुकचुकली होती
आत कुठेतरी म्हणून..

त्याच्यातला "तो "ला
अन् माझ्यातील "ती"ला
अजून माणूसपणाचा
अंतिम टप्पा टप्पा गाठायचा
बाकी आहे !!


©® छाया बेले.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .