थोर समाजसुधारक मानवतावादी अण्णाभाऊ साठे
थोर समाजसुधारक मानवतावादी अण्णाभाऊ ऐसी कळवळ्याची जाती लाभावीन करी प्रिती जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या या ओळी थोर समाज सुधारक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाशी तंतोतंत जुळून येतात. या थोर समाजसुधारकाचं मानवतेवर माणसावर अपार प्रेम होतं. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे मानव कल्याणासाठी खर्ची घातलं . अण्णाभाऊचं जीवन एखाद्या महाकाव्याचा सारखा आहे . एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव, जिल्हा. सांगली येथे निवडुंगाच्या जाळीत वसलेल्या ,ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेल्या, मांग वस्तीत जन्माला आलेले अण्णाभाऊंचा तुकाराम ते साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रवास थक्क करणारा आहे. कोणाचाही वरदहस्त पाठबळ नसताना दुनियेच्या विद्यापीठात अनुभवाचे शिक्षण घेत हे साहित्यसम्राट घडले. आपल्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाचे सोयरसुतक न बाळगता अण्णा भाऊ हे कायम इतरांसाठी लढत राहिले. कामगार व उपेक्षित समाज हा अण्णाभाऊंच्या साहित्याची प्रेरणा होता. या उपेक्षित समाजाची होणारी पिळवणूक त्यांचा जीवनसंघर्ष हे अण्णा भाऊंना लिहिण्यासाठी प्रेरित करत. या शोषित घटकाला न्याय मिळ...