पोस्ट्स

Marathi Article लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दुःख मुरू द्यावं : मनातील जखमांचा औषधापर्यंतचा प्रवास | मराठी लेख

इमेज
दुःख मुरू द्यावं : मनातील जखमांचा औषधापर्यंतचा प्रवास      प्रत्येकाच्या आत न दिसणाऱ्या अंतरिच्या जखमा असतातच. शारिरीक जखमा  दिसतात, मात्र अंतरातल्या जखमा दिसत नाही. त्या ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत असतात. फक्त त्याच व्यक्तीला ते माहित असतं. त्याची वेदनाही फक्त एकट्यालाच माहीत असते. म्हणूनच म्हणतात ' ज्याचं जळतं त्यालाच कळतं ' याचाच अर्थ  ज्याचं दुःख त्यालाच माहीत असतं.  या जखमा जीवनात कधी कधी विष बनतात तर, त्याच वेदना समजून घेतल्या तर त्याद्वारा इतरांचं दुःख समजून घेता येते. मग आपल्या वेदना इतरांच्या दुःखावर फुंकर घालण्याची समज देतात.   त्याच जखमांमधूनच संवेदनशीलता, जीवनाची समज , माणुसकी जन्माला येते. आणि हाच अनुभव एक दिवस इतरांसाठी आधार ठरतो.       मानवी आयुष्य कधीच  सरळ एक रेषीय, शांत, सुंदर, आपल्या मनासारखं नसतं. प्रत्येकाच्या वाट्याला काही तरी असं येतं, जे आयुष्यभराची जखम देऊन जातं.  यामागे आपली  चूक असतेच असेही नाही.  कधी एखाद्या नात्यात असण्याची किंमत मोजावी लागते. कधी एखाद्यावर विश्वास केल्याच...

महात्मा ज्योतिराव फुले : समता, शिक्षण, सामाजिक न्यायाची क्रांती

इमेज
महात्मा ज्योतिराव फुले : समता, शिक्षण, सामाजिक न्यायाची क्रांती      भारतीय समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की, ज्यांनी केवळ आपल्या काळातील समस्यांकडे लक्ष वेधले नाही, तर त्या समस्यांच्या मुळाशी जाऊन समाजपरिवर्तनाची पाया भरणी केली. महात्मा ज्योतिराव फुले (क्रांतीबा) हे अशा युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.     अज्ञान, अंधश्रद्धा, जातीय विषमता, सामाजिक अन्याय यांच्या विरोधात त्यांनी   उभा केलेला लढा हा केवळ समाज सुधारणांचा नव्हता, तर तो एक व्यापक सामाजिक क्रांतीचा पाया होता.     शिक्षण, समता आणि विवेक या मूल्यांवर आधारित समाजरचना उभी करण्याचे त्यांचे कार्य येत्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.     एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाज अत्यंत विषम आणि रूढीग्रस्त होता. जातिव्यवस्थेची कीड समाजाच्या प्रत्येक स्तरांवर मानवी जीवन पोखरून खात होती.     माणसाचे स्थान आणि जगण्याचे मूलभूत अधिकार हे त्याच्या जन्मावरून ठरत होते. उच्चवर्णीयांना शिक्षण, सत्ता आणि सन्मान मिळत होता, त...