पोस्ट्स

Social Reformers India लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महात्मा ज्योतिराव फुले : समता, शिक्षण, सामाजिक न्यायाची क्रांती

इमेज
महात्मा ज्योतिराव फुले : समता, शिक्षण, सामाजिक न्यायाची क्रांती      भारतीय समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की, ज्यांनी केवळ आपल्या काळातील समस्यांकडे लक्ष वेधले नाही, तर त्या समस्यांच्या मुळाशी जाऊन समाजपरिवर्तनाची पाया भरणी केली. महात्मा ज्योतिराव फुले (क्रांतीबा) हे अशा युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.     अज्ञान, अंधश्रद्धा, जातीय विषमता, सामाजिक अन्याय यांच्या विरोधात त्यांनी   उभा केलेला लढा हा केवळ समाज सुधारणांचा नव्हता, तर तो एक व्यापक सामाजिक क्रांतीचा पाया होता.     शिक्षण, समता आणि विवेक या मूल्यांवर आधारित समाजरचना उभी करण्याचे त्यांचे कार्य येत्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.     एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाज अत्यंत विषम आणि रूढीग्रस्त होता. जातिव्यवस्थेची कीड समाजाच्या प्रत्येक स्तरांवर मानवी जीवन पोखरून खात होती.     माणसाचे स्थान आणि जगण्याचे मूलभूत अधिकार हे त्याच्या जन्मावरून ठरत होते. उच्चवर्णीयांना शिक्षण, सत्ता आणि सन्मान मिळत होता, त...