पोस्ट्स

abhalmaaya लेबलसह पोस्ट दाखवत आहे

समष्टीच्या कल्याणाच पसायदान मागणारी आभाळमाया!!

इमेज
समष्टीच्या कल्याणाच पसायदान मागणारी आभाळमाया!! यावर्षीचा बालसाहित्याचा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक, आचार्य डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला मिळाला.  एखाद्या साहित्यकृतीला साहित्य अकादमी मिळते तेव्हा , सगळ्या साहित्यप्रेमींचं लक्ष त्याकडे वेधले जाते.  त्या साहित्य कृतीचे नेमके काय विशेष असेल याची वाचकांना उत्कंठा लागून राहते. याच उत्कंठेपोटी मी ही साहित्यकृती बरीच शोधाशोध करून मागवली व ती मनापासून भावली.     आभाळमाया मधून अवघा निसर्गच आपल्या समोर अवतरतो . झाडे, वेली, फळं, फुलं व निसर्गातील सर्व घटक साधेपणाने, परोपकारी जीवन जगण्याची कशी शिकवण देतात याची सुरेख  मांडणी डॉ. सुरेश सावंत यांनी केली आहे.  जेव्हा मला रडायला येतं  तेव्हा झाड अश्रू ढाळतं  जेव्हा मला आनंद होतो  तेव्हा झाड फुलं माळतं  माझ्या मनातील भावना  झाडाला बरोबर कळतात  माझ्या भुकेच्या वेळेला  झाडाची पिकली फळं गळतात     निसर्गाच्या ठायी असलेली उदारता, त्याच्यातील दातृत्वभाव निस्वार्थीपणे माणसाला सर्व काही देणाऱ्या झा...