माणसातील माणूसपण प्रकाशमान करणारे साहित्यसूर्य अण्णा भाऊ !! //
// माणसातील माणूसपण प्रकाशमान करणारे साहित्यसूर्य अण्णा भाऊ !! // -छाया बेले साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावर आतापर्यंत खूप लिहिलं गेलंय. अनेकांनी त्यांच्या साहित्यावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली, अनेकांनी ग्रंथ लिहिले. तरीही अण्णा भाऊंवर लिहायचं संपलं असं कधीच होत नाही. हेच तर या महामानवाच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यावर जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे. कारण त्यांचं कार्यच एवढं विशाल, एवढं अथांग आहे. अण्णा भाऊंचं साहित्य जितक्या वेळा वाचावं, तितक्या वेळा एक नवा पैलू, एक नवा प्रकाश समोर येतो. अण्णा भाऊंनी शोषितांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य जगाच्या चव्हाट्यावर आणलं. झोपडपट्टीत, वाडीत, वस्तीत दबलेल्या माणसाला त्यांनी साहित्यातून आत्मभान दिलं. स्त्रियांना तर त्यांनी केवळ पात्र म्हणून नाही, तर स्वाभिमानाची मशाल म्हणून उभं केलं. त्यांच्या साहित्यातून न्याय, समता, बंधुता ही मूल्यं जगली. मानवकल्याणाचा विचार त्यांनी मांडला. जे कार्य गौतम बुद्धांनी, तुकाराम महाराजांनी, बसवेश्वरांनी केलं, जो विचार, जे तत्वज्ञान या महामानवांनी जगाला दिलं, त्याच तत्वज्ञानाचा धागा अण्...