बहुपदरी स्त्री शोषणाची कविता: ' हॅपी होमच्या भिंतीआड' | पुस्तक परिचय - डॉ.मारोती कसाब
बहुपदरी स्त्री शोषणाची कविता: ' हॅपी होमच्या भिंतीआड' ----------------------------------------------- - डॉ. मारोती कसाब संशोधन मार्गदर्शक व सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर जि. लातूर पिनकोड -४१३५१७ मो. ९८२२६१६८५३ प्रस्तावना : भारतात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला इ.स.१९९० च्या दशकात प्रारंभ झाला. जागतिक आर्थिक महामंदी, माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट, नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास आणि वाढते औद्योगीकरण या पार्श्वभूमीवर जगात सर्वत्र जागतिकीकरणाचे वातावरण निर्माण झाले. जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या अमेरिकेसारख्या भांडवलदार देशाचे सत्ताकारण हेही त्यात भर टाकणारे होते. एकंदरीत मूल्यात्मक पडझडीच्या या काळात भारतासारख्या विकसनशील देशाने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत समाविष्ट व्हावे किंवा नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. कारण जागतिकीकरण ही केवळ एक सुटी संकल्पना नव्हती; तर ...