पोस्ट्स

marathi sahitya लेबलसह पोस्ट दाखवत आहे

टेकडी - mountain | मराठी कविता

इमेज
टेकडी डोळ्यांसमोर उभी असलेली  एक उंच टेकडी.. कुतुहल असते डोळ्याचं स्तिमित होऊन पाहत  राहतात डोळे  विनम्र असतं मन तिच्यापुढे  तेवढ्यात अचानक  डोळ्यादेखत  ती घरंगळत येते खाली थडग्याएवढ्या मातीचा ढीग होते आतून पोटभर सगळं पोकळ.. कसला तरी कुबट वास.. डोळे आणि नाकाची  असहायता  आतली घालमेल  सगळंच अस्वस्थ  टेकडीच्या घरंगळण्याचं ? विश्वासाची  माती होण्याचं..? नेमकं दुःख कशाचं? @छाया.

पारबता : स्त्री जाणीवा प्रगल्भ करणारी कादंबरी | लेखिका- छाया बेले | समीक्षा-बा.बा.कोटंबे |

इमेज
  पारबता: स्त्री जाणीवा प्रगल्भ करणारी कादंबरी कथा, कादंबरी आणि कविता या तिन्ही क्षेत्रात वावर असणाऱ्या प्रथितयश लेखिका छाया बेले यांची नुकतीच  'पारबता' ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. समाज माध्यमातून कादंबरी विषयी रोज काही ना काही प्रतिक्रिया उमटत आहेत. मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत असे बोलके मुखपृष्ठ ल्यालेली ही कादंबरी वाचायला घेतली. अगदी सुरुवाती पासूनच पुस्तकात अडकत गेलो. माझाही बराचसा काळ ग्रामीण भागात गेलेला असल्याने कादंबरीचे कथानक, घटना, प्रसंग जवळचे वाटायला लागले.कादंबरीतील कथानक सत्तर ते ऐंशीच्या दशकातील असावे असे वाटते. उदगीर परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा गोडवा कादंबरीच्या पानोपानी दरवळताना दिसतो . लेखिकेची सामाजिक जाण, ग्रामीण भागातील चाली रितीचा अभ्यास हे या कादंबरीचे बलस्थान असावे. ऐंशीच्या नंतर शिकून नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने खेडेगावातून बरीच माणसं शहराकडे स्थलांतरित झाली. एकदा का गाव सोडले की खेडेगावातील प्रश्न, अडिअडचणी आपल्याकडून दुर्लक्षित होतात. सुख, दुःख, लग्न, किंवा तत्सम कार्यक्रमापुरतेच आपण गावाशी जोडली जातो. या कादंबरीत न...