टेकडी - mountain | मराठी कविता

टेकडी
डोळ्यांसमोर उभी असलेली 
एक उंच टेकडी..
कुतुहल असते डोळ्याचं
स्तिमित होऊन पाहत 
राहतात डोळे 
विनम्र असतं मन तिच्यापुढे 
तेवढ्यात अचानक 
डोळ्यादेखत 
ती घरंगळत येते खाली
थडग्याएवढ्या मातीचा ढीग होते
आतून पोटभर सगळं पोकळ..
कसला तरी कुबट वास..
डोळे आणि नाकाची 
असहायता 
आतली घालमेल 
सगळंच अस्वस्थ 
टेकडीच्या घरंगळण्याचं ?
विश्वासाची  माती होण्याचं..?
नेमकं दुःख कशाचं?
@छाया.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .