पोस्ट्स

sanvidhan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्त्री शोषणाच्या उदात्तीकरणाची उफराटी रीत | पितृसत्ताक व्यवस्थेचं वास्तव .

इमेज
स्त्री शोषणाच्या उदात्तीकरणाची उफराटी रीत | पितृसत्ताक व्यवस्थेचं वास्तव   संस्कृती की  मुखवटा? भारतीय समाजात स्त्रीशोषण, पितृसत्ताक व्यवस्था आणि संस्कृतीच्या नावाखाली चालणाऱ्या अनेक गोष्टी आजही खोलवर रुजलेल्या आहेत. समाजामधे अशा अनेक गोष्टी असतात ज्या मुळे एका विशिष्ट घटकांच माणूसपण हिरावलं जातं, मात्र त्या गोष्टी ज्यांच्या हिताशी संबंधीत आहेत ते लोक या गोष्टी कशा चांगल्या आहेत असा डांगोरा कायम पिटत राहतात. तर कधी त्यावर संस्कृती नावाचं पांघरूण घालून सराईतपणे लपवल्या जातात. खरं तर संस्कृती ही माणसाला माणूसपण बहाल करणारी असावी आणि अशाच जीवनपद्धतीला संस्कृती म्हणायला हवं. मात्र होत उलटंच — आपल्याला सोईस्कर असणाऱ्या गोष्टीनां संस्कृती म्हणून खपवलं जातं.   संस्कृती जर प्रश्न विचारू देत नसेल, तर ती संस्कृती नसून नियंत्रणाचं साधन आहे.   स्त्रीशोषणाचं उदात्तीकरण अगदी त्या शोषितलाही शोषणाच्या सांगाड्यावर चढवलेला थरच खरा वाटायला लागतो. हेच स्त्री जीवन आणि स्त्रीशोषणाच्या वास्तवात वर्षांनूवर्ष सुरू आहे. तिच्या हिताच्या विरोधात असणाऱ्या अनेक गोष्टी कशा श्रेष्ठ आहेत...