कवितेचे शिर्षक : इतिहास


तुझ्या जगण्याचे संदर्भ
सगळंच तर उलट लटकवलं गेलंय
तुझ्या सृजन शक्तीलाच फासलाय काळीमा 
तूच वाढवू शकतेस गर्भात अंकुर
आणि घालू शकतेस एक नवा जीव जन्माला
या वरदानालाच चढवलाय पपाचा रंग
अन तुझ्या जन्मदात्या योनीला ठरवून टाकलयं पापाचं महाद्वार
 तुही स्वीकारलंस निमूटपणे सगळं
चालते आहेस त्याच जुनाट मळलेल्या वाटांवरून
नवसृजनासाठी उलथापालथ जरुरी असते हेच विसरलीस जणू
घालावा लागेल नांगर या जुनाट वाटांवरून
तुलाच करावं लागेल उत्खनन तुझ्या मातृ संस्कृतीच्या शोधासाठी 
अन करावं लागेल सृजन समानतेचं 
तेव्हाच येईल प्रकाश तुझ्याही वाट्याला
   
-©®छाया बेले

टिप्पण्या

  1. घालावाच लागेल नांगर या जुनाट वाटांवर...नव्या सृजनासाठी...!

    खूपच सुंदर काव्य...मनःपूर्वक अभिनंदन...!!

    भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्याची पहाट होते आहे, असे वाटते...आपल्या कवितेचा आशय खूपच आश्वासक आहे...शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .