डोळ्यात उतरू पाहणारा पाऊस | मराठी कविता
डोळ्यात उतरू पाहणारा पाऊस
थोपवलाय मी बाहेरच
म्हटलं थांब थोडसं
आजूबाजूला बरीच जण आहेत
माझ्यावर अधिकार सांगणारी
जबाबदाऱ्यांचं गाठोडही आहे डोक्यावर
या सगळ्यांसाठी श्वासच पुरेसा आहे
तुझ्यासाठी आहेच की
म्हातारपणातला निवांत एकांत
मग राहायला कायमचा डोळ्यात
मनाचं कोरडं रान भिजवायला
मीही खेळविन अंगाखांद्यावर तुला
तोपर्यंत थांब थोडसं !
- ©®छाया बेले
विचित्र अशा मानवद्रोही मनुवादी विकृतीमुळे मनाचा कोंडमारा झालेल्या स्त्रीमनाचा उत्स्फूर्त हुंकार म्हणजे छाया बेले यांची कविता...!जियो ...जियो ...!!
उत्तर द्याहटवावाह! अप्रतिम !
उत्तर द्याहटवावाह! अप्रतिम !
उत्तर द्याहटवा