पोस्ट्स

भावकविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पाऊस तिच्या डोळ्यातला

इमेज
  पाऊस... पाऊस झरत असतो  तेव्हा मला आईचे अविरत वाहणारे  डोळे आठवतात  कोणत्या नदीचे वास्तव्य होते  तिच्या डोळ्यात माहित नाही... कधीच निचरा न होणारं  एक आभाळ  भरून आहे आत  असंच वाटायचं.. पोहचायचे नाहीत  माझे हात तेव्हा  तिच्या डोळ्यापर्यंत आज पाऊस सुरू  असताना  तिच्या डोळ्यातला पाऊस आठवतो  तेव्हा  खिडकीच्या  काचावर साचलेल्या  पावसाच्या  थेंबावरून अलगद हात फिरवते... आताही पोहचत नाहीत माझे हात थेंबापर्यंत... @छाया बेले.

नियतीलाही भिडलो आपण

इमेज
जन्म देऊनी झाले आई  फळा आलेली तू पुण्याई  हसलो आपण दोघी सोबत  रडतानाही रडलो सोबत कणाकणाने तुझ्या सवे मी  आपण दोघी घडलो सोबत  नियती आली आड कुठेही  नियतीशीही भिडलो आपण वाटेवरती खळगे पाहून  जरा कुठे ना अडलो आपण  आत व्हायचे उजेड आधी  अंधार कुठेही उरत नाही  घेऊन उजेड आतला मग काळावर भारी पडलो आपण  @छाया बेले.

लेक..| मराठी कविता

इमेज
केव्हाची  काही तरी शोधतेय मी  घर अंगण  सगळं उलथापालथ  करून झालंय  अंगणातला जाईचा वेल  मोगऱ्याच्या कळ्या  चिमणीचा खोपा त्यातली पिल्लं... घरातही सगळं  जसंच्या तसं आहे  कोणीतरी श्वास काढून  बाजूला ठेवून दिलाय असं काहीसं वाटतंय  आज लेक घराबाहेर  गेलीये... @छाया बेले.

चांदणआभाळ | मराठी कविता

इमेज
व्यक्त अव्यक्ताच्या विस्तिर्ण अंधारपोकळीत कोसळत राहतं भयाण एकटेपण तेव्हा माझ्या अस्तित्वावर मी माळून घेते  तुझ्या  अस्तित्वाचं   चांदणंआभाळ मीच देते त्याला  एकेक नाव कधी आई,  कधी बाप कधी सखा कधी माझ्याच अस्तित्वात विलिन करून घेते आणि फिरवून दाखवते माझ्यातील  सांदिकोपरे जे कधीचे बंदिस्त करून ठेवलेत तुझ्या सोबत असताना पाषाणाला फुटावेत झरे तसं कधी पापणीत तर कधी काळजात पसरते ओल अन् अंकुर फुटून पुन्हा तरारून येतं  जगणं.. @छाया.

आलं आभाळ भरून | मराठी कविता

इमेज
लई दिसानं आभाळ आज आलया भरून थेंब थेंब झेलायाला धरा ओटी पसरून काळजाची पायघडी केली प्राणांची आरास पापण्याच्या परिघात व्यापलेला तुझा ध्यास इथे जीव ईवलाले उभे कधीचे झुरून तुझ्या थेंबानं बिजाचे आले कोंब तरारून नेसला हिरवा शालू सौभाग्याचं लेणं ल्याली वयातल्या पोरीवाणी धरा न्हातीधुती झाली दिलं सपनाचं दान ओटी भरून नभानं तिच्या कुशीत रुजलं नवं उद्याचं जगणं छाया बेले

भाळ अन् दुःख सख्खे यार झाले | मराठी कविता

इमेज
जीवनाशी खेळणे हे फार झाले झोपेत होते अन् पाठीत वार झाले गुप्त यांची  खलबते ही झाली कधी भाळ अन् दुःख सख्खे यार झाले देशभक्तीच्याच बाता बोलती जे विकला त्यांनी देश अन् फरार झाले समजले मी काळजाचे शिल्प ज्याला  तेच नाते वालुकेचे घर  झाले विडा होता उचललेला रक्षणाचा दार ते कसे घराला फितूर झाले  ©® छाया बेले 🖋

काळीज मीच माझे सोलून घेतले | मराठी कविता

इमेज
वाहत्या क्षताला शब्दात ओतले काळीज मीच माझे सोलून घेतले आरोप क्षिणतेचा लावू नको कधीही घाव आयुष्या तुझे मी झेलून घेतले घेणे मला नाही कोण मोल किती करतो कसोटीच्या मापात मला मी तोलून घेतले मृत्यू आला कितीदा घेऊन यान त्याचे पण  त्यातही सुखाने रेलून घेतले छाया बेले©️®️

कुलीन दुःख | मराठी कविता

इमेज
रात्रीचा गडद  अंधार पांघरूण त्या शापित खंडरात भटकताहेत अनेक अतृप्त आत्मे परसदारी विखुरल्यात जगण्याच्या शिळा तिथल्या भिंतींनी  गिळंकृत केलेत श्र्वासांचे प्रवाह.. तिथेच एका कोपऱ्यात चिमणीच्या पिल्लाने घरट्यात केलीय आत्महत्या आपलाच श्र्वास कोंडून तिथल्या जवाहिरखान्यातून एका कुलीन दु:खाचे  हुंदके पडत असतात कानावर.. या सर्वांना केला जातो मद्याचा अभिषेक  रात्रिच्या अंधारात... छाया बेले

माहित नाही | मराठी कविता

इमेज
Date: Nov 22, 2019 काय हवंय काय हरवलंय कुठे जायचंय माहित नाही सगळ्याच वाटा धुसर.. सुखाच्या शोधात पदरात घेतलेला इंगोळ होरपळत जातो मन तरीही भान हरपल्यागत चालत राहणं  एकाकी वाटेवरुन मन बुद्ध झालंय की दगड हेच कळत नाही ©®छाया बेले🖋

सिमोलंघन | मराठी कविता

इमेज
स्वप्नं आणि भासाच्या पलीकडून एक ध्वनी येतोय ये ना बाहेर निळ्या आभाळाखाली.. मन ओढ घेतय त्या दिशेने वाटतय पडावं बाहेर.. निळ्या आभाळाखाली घ्यावा मुक्त श्वास सृष्टीत व्यापून राहिलेल्या जिवंतपणात व्हावं एकरूप काढून वाळत घालावं माझ्यातील मीपणासह, भळभळते दुःख, ठसठसत्या वेदनेसहीत सगळंच देहधर्म विसरून व्हावं निराकार मनावरचे सगळे भार अर्पण करावेत एखाद्या निर्मळ झऱ्यात मी करू पाहतेय उंबरठ्याचं सिमोलंघन टाकते एक पाऊल पुढे.. तेव्हा माझ्या जगण्याची समिक्षा करणारे अनेक प्रश्न उभे असतात दारावर पहारा देत एक अद्रुष्य शक्ती लोटते पुन्हा आत मी साठवतेय कणाकणाने दारुगोळा उरात उंबरठे ध्वस्त करण्यासाठी !! ©® छाया बेले ✍

डोळ्यात उतरू पाहणारा पाऊस | मराठी कविता

इमेज
डोळ्यात उतरू पाहणारा पाऊस थोपवलाय मी बाहेरच म्हटलं थांब थोडसं आजूबाजूला बरीच जण आहेत माझ्यावर अधिकार सांगणारी जबाबदाऱ्यांचं गाठोडही आहे डोक्यावर या सगळ्यांसाठी श्वासच पुरेसा आहे तुझ्यासाठी आहेच की म्हातारपणातला निवांत एकांत मग राहायला कायमचा डोळ्यात मनाचं कोरडं रान  भिजवायला मीही खेळविन अंगाखांद्यावर तुला तोपर्यंत थांब थोडसं ! - ©®छाया बेले