लेक..| मराठी कविता



केव्हाची 
काही तरी शोधतेय मी 

घर अंगण 
सगळं उलथापालथ 
करून झालंय 

अंगणातला
जाईचा वेल 
मोगऱ्याच्या कळ्या 
चिमणीचा खोपा
त्यातली पिल्लं...
घरातही सगळं 
जसंच्या तसं आहे 

कोणीतरी श्वास काढून 
बाजूला ठेवून दिलाय
असं काहीसं वाटतंय 

आज लेक घराबाहेर 
गेलीये...

@छाया बेले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .