आलं आभाळ भरून | मराठी कविता


लई दिसानं आभाळ
आज आलया भरून
थेंब थेंब झेलायाला
धरा ओटी पसरून

काळजाची पायघडी
केली प्राणांची आरास
पापण्याच्या परिघात
व्यापलेला तुझा ध्यास

इथे जीव ईवलाले
उभे कधीचे झुरून
तुझ्या थेंबानं बिजाचे
आले कोंब तरारून

नेसला हिरवा शालू
सौभाग्याचं लेणं ल्याली
वयातल्या पोरीवाणी
धरा न्हातीधुती झाली

दिलं सपनाचं दान
ओटी भरून नभानं
तिच्या कुशीत रुजलं
नवं उद्याचं जगणं

छाया बेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .