पाऊस तिच्या डोळ्यातला

  पाऊस...
पाऊस झरत असतो 
तेव्हा मला आईचे
अविरत वाहणारे 
डोळे आठवतात 

कोणत्या नदीचे
वास्तव्य होते 
तिच्या डोळ्यात
माहित नाही...

कधीच निचरा न
होणारं 
एक आभाळ 
भरून आहे आत 
असंच वाटायचं..


पोहचायचे नाहीत 
माझे हात तेव्हा 
तिच्या डोळ्यापर्यंत

आज पाऊस सुरू 
असताना 
तिच्या डोळ्यातला
पाऊस आठवतो
 तेव्हा 
खिडकीच्या 
काचावर साचलेल्या 
पावसाच्या 
थेंबावरून अलगद
हात फिरवते...

आताही पोहचत नाहीत
माझे हात थेंबापर्यंत...

@छाया बेले.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .