काळीज मीच माझे सोलून घेतले | मराठी कविता






वाहत्या क्षताला शब्दात ओतले
काळीज मीच माझे सोलून घेतले

आरोप क्षिणतेचा लावू नको कधीही
घाव आयुष्या तुझे मी झेलून घेतले

घेणे मला नाही कोण मोल किती करतो
कसोटीच्या मापात मला मी तोलून घेतले

मृत्यू आला कितीदा घेऊन यान त्याचे
पण  त्यातही सुखाने रेलून घेतले

छाया बेले©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .