कविला नसतेच निवांत झोप | मराठी कविता



कविला नसतेच निवांत झोप
त्याच्याच जाणीवा
घालतात नांगर
त्याच्या निवांत क्षणावर
अन् वाहून घेऊन जातात
सृष्टीतील वेदनांचे ओघळ
त्याच्या पर्यंत
अन् वाहू लागते वेदना


मेंदूसह देह मनाच्या आरपार
तो तडफडत राहतो
रक्त ठिबकत राहते
वहिच्या पानापानावर

©®छाया बेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .