पोस्ट्स

मराठी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गुन्हेगार बाया |मराठी कविता

इमेज
गुन्हेगार बाया  माझ्यासह मागच्या, पुढच्या  कोणत्याही पिढीतील  केस कापलेल्या न  कापलेल्या  कपड्यांना पदर असलेल्या , पदर नसलेल्या  घरात राहणाऱ्या , घराबाहेर जाणाऱ्या  बोलणाऱ्या न बोलणाऱ्या  विचार करणाऱ्या  बावळट ठरणाऱ्या घळा घळा रडणाऱ्या  आतल्या आत कुढणाऱ्या प्रेम करणाऱ्या ,  प्रेम न करणाऱ्या  हक्क मागणाऱ्या  हक्क सोडणाऱ्या  नवरा असलेल्या, नसलेल्या   मुलं देणाऱ्या , मुलं  न होणाऱ्या  श्वास घेणाऱ्या , जीव देणाऱ्या दिल्या घरी असो की येल्या घरी  जिथे असतील तिथे  सगळ्याच बाया गुन्हेगार आहेत  त्यांनी  पुरूष जन्माला घातलाय .. !! @छाया बेले .

गोष्ट छोटी लाख मोलाची | आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख

इमेज
     जबाबदारीची जाणीव आपल्या मुलांना आपण कायम आपल्यापेक्षा लहानच समजत असतो. किंवा नवीन पिढी बेजबाबदार असं बोलल्या जातं. मात्र ती आपल्या पेक्षा खूप मोठी आणि जबाबदार झाल्याचा प्रत्यय एखाद्या घटनेतून येतो. असाच एक अनुभव मलाही आला. सगळी कामं आटोपून मी एका ऐप वर एक गाणं गुणगुणत होते. संगिंतासह गाण्याचे बोल उपलब्ध असल्याने आपल्याला आवडणारं गाणं आपण शेवटपर्यंत म्हणू शकतो. त्यातला काही भाग जरी मुळ गाण्यासारखा आला तरी ते खूप सुखद वाटतं. असंच एक मला आवडणारं लतादीदीच गाणं गुणगुणत होते. तो जवळच बसून होता. मधून मधून काही तरी बोलत होता. मी त्याला हातानेच दोन मिनिटे थांब असं सांगून मी माझ्या गाण्यावर लक्ष केंद्रित केलं. मधेच त्याने व्यत्यय आणल्यामुळे चिडले पण होते. या क्षणात जी वेळ आहे. किंवा जे काही आहे ते फक्त माझं आहे. त्यात कोणाचीही भागिदारी मला मान्य नव्हती. त्यामुळे मी कुणाचही काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. तो काही तरी बोलत होता. आणि मी दुर्लक्ष करून मी माझ्यात मग्न होते. शेवटी गाणं संपल्यावर चिडून म्हणाले - "हं बोल आता.. दोन मिनिटे थांब असं सांगूनही तुझं सुरूच ...

मी घडत जाताना

इमेज
    //मी घडत जाताना//      माझ जन्मगाव मराठवाड्यातील नांदेड शहरापासून बसने  दोन ते अडीच तासाच्या अंतरावर मुखेड तालुक्यात 'माकणी' हे छोटासं गाव आहे.  आज घडीला या गावची लोकसंख्या पंधराशे आहे.      डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात सगळीकडून कोणत्याही मार्गाने गेले तरी गावाच्या जवळ गेल्याशिवाय  गाव दिसत नाही.      वेशीबाहेर दलित वस्ती, यात गावाच्या आत शिरण्याआधी सुरवातीला एक छोटा मांगवाडा लागतो. त्यानंतर मारुतीचा पार , पाराच्या नंतर त्या काळचा महारवाडा , त्यानंतर दुसरा मांगवाडा.     गावात वेशीच्या आत मराठा, हटकर या दोन जाती बहुसंख्यांक आहेत . जास्त लोकसंख्या या दोन जातीची आहे.  बाकी एक मुसलमानाचे घर हे छोट्या मांगवाड्याशेजारी मात्र गावाच्या आत आहे. याव्यतिरिक्त  कोमट्याची दोन घरं. सुताराचे एक घर, लोहाराचे एक घर.      गावातील सगळ्या लोकांकडे शेती होती.  कुणाकडे कमी- जास्त हलकी, भारी असेल पण सगळे शेतकरीच होते. छोट्या मांग वाड्यातील तसेच महारवाड्यातील लोकांकडेही शेती होती ...

कारण ती बाई आहे | मराठी कविता

इमेज
पोटाच्या खळगी साठी त्याच्या सोबत उन्हात राबून घरी येताच झोंबते चुलीला शरिराच्या ठणका घालते चुलीत लाकडासह... कारण ती बाई आहे तो कष्टानं कण्हत असलेला पाहून चेपते अंग मायेनं चिल्यापिल्यांना भरवून अर्धवट भरल्या पोटानं देते त्रुप्तिचा ढेकर कारण ती बाई आहे आलीच देहाची हाक तर शिरते अलगद  कुशीत त्याच्या चेहऱ्यावरचा शिण पाहून कळवळते आपल्या देहाची भूक  पटकुरात बांधून घेते उशाला अन् तान्हूलं बाजूला सारून त्यालाच ममतेनं घेते कुशीत कारण ती बाई आहे ............... तो मात्र हवं तेव्हा केस ओढून घेतो  जीवघेणी ठणक उतरते केसाच्या मुळातून काळजापर्यंत तरीही ती शांत कारण ती बाई आहे दिवसाबरोबर उठणारे त्याचे फुत्कार घेते सामावून धरतीनं म्रुतदेहाचे अवषेश सामावून घ्यावं तसं कारण ती बाई आहे ! छाया बेले ✍🏼

तमीजखोर | मराठी कविता

इमेज
तमीजखोर बाईनं कसं नाजूक दिसावं.. नाजूक हसावं.. दिसेल अंग असं काही तरी नेसावं हसून द्यावा प्रतिसाद अनैतिक इच्छांना लिहिलंच तर लिहावं प्रेम.. विरह.. मिलनावर करूच नये कधी युद्धखोरिची भाषा संघर्षापासून कायम दूर असावं अशी अपेक्षापूर्ती करणारी तुमच्या म्हणण्याप्रमाणे (तमीजखोर ) नाही राहिली ती आता तिने छेडलाय संघर्ष अस्तित्वाच्या नवनिर्मितिचा !! छाया..🖋

कविला नसतेच निवांत झोप | मराठी कविता

इमेज
कविला नसतेच निवांत झोप त्याच्याच जाणीवा घालतात नांगर त्याच्या निवांत क्षणावर अन् वाहून घेऊन जातात सृष्टीतील वेदनांचे ओघळ त्याच्या पर्यंत अन् वाहू लागते वेदना मेंदूसह देह मनाच्या आरपार तो तडफडत राहतो रक्त ठिबकत राहते वहिच्या पानापानावर ©®छाया बेले