बा, क्रांतीसुर्या | मराठी कविता
Date: Apr 11, 2020
बा.. क्रांतीसुर्या
तुझे कर्जदार आहेत
इथल्या लेकीबाळी,
इथले सगळेच उपेक्षित जीव..
या अनाथ जनसमुदायाचा
झालास वाली ,
घेतलंस उराशी कवटाळून
धरलंस आभाळछत्र डोक्यावर
तू दिवा नाही तर अख्खा
सुर्य होवून उगवलास प्रत्येक
झोपडीतून
सत्याच्या आसुडाने फोडून काढल्या
माणसाचं माणूसपण कैद करणाऱ्या उतरंडी..
तुझाच उजेड वाहतोय आजही
गावकुसाबाहेरील वस्त्यातून !!
©️®️छाया बेले✒️
---
छान
उत्तर द्याहटवा